एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India vs Australia : पंतप्रधान मोदींसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची हजेरी अन् सेलिब्रिटींची मांदियाळी; फायनल पाहायला कोण-कोण येणार? पाहा संपूर्ण यादी

World Cup 2023, India vs Australia : वर्ल्ड कपच्या फायनल सामन्याला पंतप्रधान मोदी, अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्ससह अनेक सेलिब्रिटीही मैदानावर उपस्थित राहणार आहेत.

IND vs AUS Final : विश्वचषकाचा (World Cup 2023) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) रविवारी अहमदाबादेत रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) 19 नोव्हेंबरला हा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला (World Cup 2023 Final) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी, अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्ससह अनेक सेलिब्रिटीही मैदानावर उपस्थित राहणार आहेत. या महामुकाबल्यासाठी अहमदाबादसह नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालं आहे. सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

अंतिम सामना पाहायला कोण-कोण येणार?

विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) मधील भारताचा (India) पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळला गेला. यानंतर टीम इंडियाने (Team India) सलग विजयांची नोंद करत अंतिम फेरीत (World Cup 2023 Final) प्रवेश केला आहे. टीम इंडियाने 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 'मेन इन ब्लू' अंतिम विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी 2525 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांनी 85 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंचा विश्वचषकातील विक्रम कांगारूंना धडकी भरवणारा आहे. हा सामना पाहण्यासाठी काही खास जण हजेरी लावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडिअमवर 132000 प्रेक्षक सामना पाहू शकतात. अंतिम सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक मैदानावर पोहोचणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी हा सामना पाहण्यला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीयाशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील मैदानावर पोहोचू शकतात.

फायनलमध्ये धोनीचीही उपस्थिती

काही खास राजकीय व्यक्ती, उद्योगपती, बॉलिवूड स्टार्स सह, अनेक माजी क्रिकेटपटूही हा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचणार आहे. यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे टीम इंडियाचा माजी कणर्धार महेंद्र सिंह धोनी. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  धोनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. धोनीने विजयी षटकार ठोकून भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवलं होतं. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया धोनीशिवाय वर्ल्ड कप खेळत आहे. या अंतिम सामन्यात संघाचं मनोबल वाढवण्यासाठी धोनी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

अंतिम सामन्याला हजेरी लावणाऱ्या दिग्गजांची यादी

  • पंतप्रधान मोदी
  • कपिल देव
  • एम एस धोनी
  • सचिन तेंडुलकर
  • अमित शाह
  • जय शाह
  • रॉजर बिन्नी
  • राजीव शुक्ला

अंबानी-अदानी आणि बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी

याव्यतिरिक्त आठ राज्यांचे मुख्यमंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि इतर अनेक दिग्गज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget