(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, WT20 Live Score : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
India vs Australia Live Score : टी 20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
LIVE
Background
Women's T20 World Cup Semi Final Live : महिला टी 20 विश्वचषक अंतिम टप्यात पोहचला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना आज रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी लढत होणार आहे. पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. सेमीफायनलचा सामना जिंकणं तसं पाहायला गेलं तर भारतीय संघासाठी फारसं सोपं नसणार आहे. कारण भारतीय महिला संघाचा कांगारू संघाविरुद्ध टी-20मधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. जर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेले शेवटचे पाच सामने पाहिले तर त्यातही भारतीय संघ मागे पडल्याचं दिसतंय.
टीम इंडियाला मोठा धक्का, उपांत्य सामन्यापूर्वी पूजा वस्त्राकर आजारी
टी 20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्याला काही तास शिल्लक असतानाच भारतासाठी एक चिंताजनक बातमी आली आहे. भारताची आघाडीची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर आजारी आहे. त्यामुळे ती उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पूजा वस्त्राकर हिच्या जागी प्लेईंग 11 मध्ये स्नेह राणा हिला संधी देण्यात येणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केलेय. सुत्रांच्या माहितीनुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खेळण्यावरही सस्पेन्स आहे. हरमनप्रीत कौरही आजारी आहे, त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार असल्याचे काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. हा भारतासाठी मोठा धक्का असू शकतो. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वीच पूजा वस्त्राकर हिला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती उपांत्य सामन्याला मुकणार आहे. पूजाच्या जागी स्नेह राणा हिला संघात स्थान देण्यात आले आहे.
पिच रिपोर्ट
महिला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण, दुसऱ्या डावात फलंदाजीला खेळपट्टी मदत करेल.
हेड टू हेड -
हरमनप्रीतच्या टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. याआधीचा रेकॉर्ड पाहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दोन्ही संघ आतापर्यंत टी 20 मध्ये 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं तब्बल 22 वेळा विजय मिळवला आहे. तर भारताला सात सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता.
भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
भारताचा पाच धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
भारताला आठवा धक्का,
भारताला आठवा धक्का, राधा यादव बाद
भारताला आणखी एक धक्का
स्नेह राणाच्या रुपाने भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताला विजयासाठी सहा चेंडूत 16 धावांची गरज
भारताला सहावा धक्का
ऋचा घोषच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसला.
भारताला मोठा धक्का, हरमनप्रीत बाद
मोक्याच्या क्षणी हरमनप्रीत कौर बाद झाली. अर्धशतकानंतर हरमनप्रीत बाद झाली. भारताला विजयासाठी 32 चेंडूत 40 धावांची गरज आहे.