(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Afghanistan : विश्वचषकात भारत विजयी वाटचाल कायम ठेवणार? अफगाणिस्तानशी मुकाबला; टीम इंडिया दिल्लीत दाखल
IND vs AFG, World Cup 2023 : विश्वचषकात भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामना 11 ऑक्टोबरला रंगणार आहे. आगामी सामन्यासाठी भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत.
India vs Afghanistan, World Cup 2023 : विश्वचषकात (World Cup 2023) विजयी सलामीनंतर भारताचा (Team India) मुकाबला आता अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी होणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना 11 ऑक्टोबरला रंगणार आहे. आगामी सामन्यासाठी भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना दुपारी 2 वाजता रंगणार आहे. टीम इंडियाने सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारत विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
IND vs AFG, World Cup 2023 : कुणाचं पारडं जड?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात भारताचं पारडं जड असल्याचं आकडेवारीमध्ये दिसून येतं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत.
भारत-अफगाणिस्तानमध्ये फक्त तीन वनडे सामने
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला सामना मार्च 2014 मध्ये झाला होता. मीरपूरमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. दुसरा सामना सप्टेंबर 2018 मध्ये झाला. हा सामना बरोबरीत सुटला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे जून 2019 मध्ये खेळला गेला. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानचा 11 धावांनी पराभव केला.
विश्वचषकात भारताची विजयी सलामी
विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पहिल्या सामना कांगारूंना पुरतं नमवलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सलामी सामना सहाविकेट्सने जिंकला. आता हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबरला बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाचा उपांत्य फेरीपूर्वी शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार असून हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.
विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलची स्थिती
वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट्स (World Cup 2023 Points Table) टेबलमध्ये सध्या न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने एक सामना खेळून तो सामना जिंकला आहे. न्यूझीलंडसह दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशनेही पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सर्व संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. पण, जास्त नेट रनरेटमुळे न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
World Cup 2023 : शुभमन गिलच्या जागी 'हा' खेळाडू घेणार? आकडेवारीत केएल राहुलला टाकलं मागे