एक्स्प्लोर

IND vs PAK, 1 Innings Highlight: अर्शदीप-पांड्याची कमाल, पण शान मकसूदसह इफ्तिकार अहमदची एकहाती झुंज, भारतासमोर 160 धावांचे आव्हान  

ICC T20 WC 2022, IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी घेत पाकिस्तानला 159 धावांवर रोखलं आहे. यावेळी अर्शदीपने आणि हार्दीकने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

IND vs PAK, T20 : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामना सुरु असून पाकिस्तानचा डाव 159 धावांवर आटोपला आहे. भारताकडून हार्दीक आणि अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण पाकिस्तानकडून शान मकसून आणि इफ्तिकार अहमदने अर्धशतकं ठोकत पाकिस्तानचा डाव सावरला आहे. आता भारताला 20 षटकांत विजयसाठी 160 धावा करायची गरज आहे. 

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी बुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

हे देखील वाचा-

IND vs PAK, Playing 11 : पाकिस्तानविरुद्ध अंतिम 11 मध्ये पंत, चहल नाही, 6 फलंदाजांसह रोहित मैदानात, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik on Acharya Marathe College :चेंबुर कॉलेजच्या जीन्स , टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतBuldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक; घेतला मोठा निर्णय
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Embed widget