(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वनडे विश्वचषकात पाकिस्तानचा ख्वाडा, आता केली नवीन मागणी
ICC Cricket World Cup 2023 scheduled : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
ICC Cricket World Cup 2023 scheduled : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. त्याला कारण पाकिस्तान संघ जबाबदार आहे. कधी भारतामध्ये खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला.. तर कधी सुरक्षेचं कारण दिले... पाकिस्तानने प्रत्येकवेळा स्पर्धेत ख्वाडा टाकलाय. आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नवीन डिमांड ठेवली आह. पाकिस्तानने विश्वचषकाआधी अफगाणिस्तानविरोधात वॉर्मअप सामना खेळण्यास नकार दिलाय. आशिया खंडाबाहेरील संघासोबत त्यांना वॉर्मअप सामना हवाय.
आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे विश्वचषकात अफगाणिस्तानविरोधात खेळण्यात पाकिस्तान संघाने नकार दिलाय. त्याबाबत आयसीसीला पत्र पाठवण्यात आलेय, असे वृत्त जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अफगानिस्तान यांच्याविरोधातील सामन्याचे ठिकाण बदला - पीसीबी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्याविरोधात होणाऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विश्वचषकात पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोर तर अफगाणिस्तानविरोधात चेन्नईविरोधात सामना खेळणार आहे. पाकिस्तानला या दोन्ही ठिकाणावरुन आक्षेप आहे.
'या' दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होईल. तसेच, भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड 29 ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड 4 नोव्हेंबरला अहमदाबाद आणि 1 नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येतील. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये 9 शहरांमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाचे ग्रुप स्टेजमधील सामने पाच ठिकाणी होणार आहेत.
48 सामन्यानंतर मिळणार विश्वविजेता -
यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.