एक्स्प्लोर

मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद

Hemant Dhole Appeal to Vote in BMC Election: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सुद्धा मतदानाचा अधिकार बजावत मराठी माणसाला मतदानासाठी भावनिक आवाहन केलं. 

Hemant Dhole Appeal to Vote in BMC Election: अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष मागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी लवकर मतदान करत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन केलं आहे. दुसरीकडे मतदार मतदानासाठी बाहेर पडले असतानाच निवडणूक आयोगाचा घोळ सुद्धा दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव न सापडणं, एकाच कुटुंबातील नाव दोन-तीन ठिकाणी असणं,  ईव्हीएम बंद पडणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. 

दुसरीकडे, मुंबईमध्ये सुद्धा मतदान आज सकाळपासूनच होत आहे. सचिन तेंडुलकरने सकाळीच सहकुटुंब मतदान करत मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे मराठी कलाकारांकडून सुद्धा मतदान होताच मतदान अधिकार बजावण्यासाठी आवाहन केलं जात आहे. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सुद्धा मतदानाचा अधिकार बजावत मराठी माणसाला मतदानासाठी भावनिक आवाहन केलं. 

हेमंत ढोमेनं मतदानाचा सेल्फी शेअर करत ट्विट केलं आहे. मराठी माणसासाठी! ‘महाराष्ट्राच्या’ मुंबईसाठी! सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा. 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका! असे नमूद केलं आहे. 

गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा

दुसरीकडे, अभिनेत्री जिगना त्रिवेदीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य केलं आहे. ती म्हणाली," नमस्कार महाराष्ट्र. कसे आहात. महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मतदान करायला तयार आहात का? एक सांगते, जेव्हा आपण सारे कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा आपण विचार करतो. बाईने जर दोन-तीन दिवस भांडी नाही घासली तर तिच्याकडे तक्रार करतो. मग आता आपलं महाराष्ट्र राज्य पुढच्या पाच वर्षात कोणाच्या हातात द्यायचा आहे याचा निर्णय घेण्याची संधी आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. मुंबई हे विकसित शहर होतच. त्यामुळे गेलं कित्येक वर्षांपासून लोक इथे काम करायला येतात. त्यामुळे केवळ मुंबई विकसित करून चालणार नाही. ग्रामीण भागातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासाकडे बघा. विकास हा महत्त्वाचा आहेच. पण आपल्याला असा विकास नकोय जिथे आपला श्वास गुदमरेल. आपली पुढची पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत निघेल. आपल्यासमोर कितीतरी डोळे उघडणारा वास्तव आणि फॅक्ट्स आहेत. त्याच्याकडे बघा. " ती पुढे म्हणाली," मुंबई आता संधी आणि वेळ दोन्ही आहेत. आता तुमची चॉईस कोण चांगलं किंवा वाईट यामध्ये नाही. तर कोण कमी वाईट आहे आणि कोण जास्त वाईट आहे याच्यात आहे. आता आपला महाराष्ट्र खऱ्या राजाच्या हातात द्यायची संधी आहे. ही संधी चुकवू नये. जय महाराष्ट्र." जिगना त्रिवेदी एक लोकप्रिय गुजराती अभिनेत्री आहे. जिगनाचे अनेक गुजराती नाटक आणि सिनेमे गाजले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
आपलं पर्यावरण संस्थेचा अनोखा उपक्रम! नाशिकमध्ये कावळा आणि गिधड यांच्यात निवडणूक, कोणत्या पक्षानं मारली बाजी? 
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
काही लोकांनी खूप मोठ्या बैठका घेतल्या, जिल्हाभर फिरुन निवडून लढवण्याची तयारी केली, पण... जयकुमार गोरेंचा नाव न घेता मोहिते पाटलांना टोला
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, 10 उमेदवार बिनविरोध, शेकापचे बाबासाहेब पाटीलही भाजप पुरस्कृत पॅनेलमध्येच

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget