एक्स्प्लोर

T20 World Cup 2022: पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान म्हणतात, आमच्याकडे जगातील बेस्ट गोलंदाज आहेत, पण... 

Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला. ज्यामुळे पाकिस्तानचं विश्वचषक विजयाचं स्वप्न थोडक्यात हुकलं. 

Imran Khan on PAK vs ENG Final : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर (ENG vs PAK) 5 गडी राखून विजय मिळवत विश्वचषक उंचावला आहे. दरम्यान सामन्यात पाकिस्तानने देखील इंग्लंडला कडवी झुंज दिली. पण पाकिस्तानने दिलेलं 138 धावाचं आव्हान फारच माफक असल्यानं अखेर त्याला पराभव पत्करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर सर्वच पाकिस्तानी कमालीचे निराश असून पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत. पण शाहीन आफ्रिदीचं सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त होणं संघाला महाग पडलं...'

टी20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर इम्रान खान म्हणाले, ''मी खूप दिवसांनी क्रिकेट पाहिलं. सध्या पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत. आमचा संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. पण अंतिम सामन्यात शाहीनच्या दुखापतीमुळे संघाला अडचण सहन करावी लागली.' तसंच पुढे बोलताना खान म्हणाले, 'मी संघाला नेहमी सांगतो की आपण सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत लढले पाहिजे आणि यावेळीही आमच्या संघाने तेच केले. मला माहित आहे की सध्या पाकिस्तानची जनता पराभवाच्या धक्क्यातून जात आहे. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. शाहीन आफ्रिदी चांगला खेळत होता. पाकिस्तान संघ ज्या प्रकारे अंतिम फेरीत पोहोचला त्याबद्दल त्याचं अभिनंदन.'

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणारSolapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget