ENG vs IND, 3rd T20 : सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारत 17 धावांनी पराभूत झाला आहे. पण मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे.
India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना नुकताच इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडला. या हायवोल्टेज सामन्यात अखेर भारताचा 17 धावांनी पराभव झाला. पण तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने एक दमदार असं शतक ठोकलं, पण तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही
सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. भारताने सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडलं, पण नंतर डाविड मलानने (Dawid Malan) तुफान फटकेबाजी करत दमदार असं अर्धशतक लगावलं. त्याच्या कमाल खेळीमुळे इंग्लंडची धावसंख्या काही ओव्हर्समध्येच वाढली. मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. बिश्नोईने त्याची विकेट घेतली, पण त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने तुफान फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडने 20 षटकात इंग्लंडने 215 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. भारताकडून बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन तर आवेश आणि उमरानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
सूर्याची एकहाती झुंज व्यर्थ
216 धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. रोहित, विराट प्रत्येकी 11 तर पंत एक धाव करुन बाद झाला. ज्यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. पण 28 धावा करुन अय्यर बाद झाल्यानंतर मात्र सूर्याला कोणाचीच साथ मिळाली नाही. पुढील एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठता आली नाही. अशामध्ये सूर्या एकाबाजूने झुंज देत होता. पण अखेर 25 धावा हव्या असताना सूर्यकुमार मोईन अलीच्या चेंडूवर सॉल्टकर्वी झेलबाद झाला. त्याने 55 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांस 117 रन केले. पण तो भारताला विजय मिळवू देऊ शकला नाही. इंग्लंडकडून आर. टोप्लेने 3, ख्रिस आणि डेविड विलीने प्रत्येकी 2 रिचर्ड आणि मोईन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-