एक्स्प्लोर
... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही
गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव सुरु आहे. चांगल्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ सुरु आहे. काही फ्रँचायझींनी दिग्गज खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे, तर काही फ्रँचायझींनी असे निर्णय घेतले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या बाबतीतही असंच काहीसं चित्र आहे. 2012 आणि 2014 साली केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार गौतम गंभीरला केकेआरने यावेळी रिटेन केलं नाही. शिवाय लिलावातही त्याला मॅच टू राईटचा (आरटीएमचा) वापर करत खरेदी केलं नाही.
गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. या किंमतीत कोलकात्याला गंभीरला खरेदी करण्याची संधी होती. मात्र त्यांनी आरटीएमचाही वापर केला नाही. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि अनेकांनी काही प्रश्नही उपस्थित केले.
त्यामुळे आता कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंकी मैसूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोलकात्यापासून वेगळं होण्याचा निर्णय स्वतः गंभीरनेच घेतला होता, अशी माहिती मैसूर यांनी दिली आहे.
''गौतम गंभीर हा केकेआरच्या धोरणाचा एक भाग होता. मात्र त्याने स्वतःच विनंती केली होती, की मला आरटीएमनेही खरेदी करु नका'', अशी माहिती मैसूर यांनी दिली. शिवाय त्यांनी गंभीरला नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छाही दिल्या.
केकेआरने यावेळी सुनील नारायण, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, पियुष चावला, कुलदीप यादव, ख्रिस लीन यांसारख्या खेळाडूंना खरेदी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
