एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघातून मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले. या तिघांच्या जागी आकाश दीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरचे भारतीय संघात पुनरागमन झाले.

Washington Sundar : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्यात कसोटीत वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार फिरकी गोलंदाजी करताना पाहुण्या संघाला 259 धावांत गारद केले. तीन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या सुंदरने 59 धावांत 7 जणांना माघारी धाडत टीम इंडियाला संकटातून तारले. पहिल्या कसोटीत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी प्रत्युत्तरात भारताने खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून 16 धावा केल्या. शुभमन गिल 10 आणि यशस्वी जैस्वाल 5 धावांवर नाबाद आहे. पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघात तीन बदल

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघातून मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले. या तिघांच्या जागी आकाश दीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मॅट हेन्रीच्या जागी मिशेल सँटनरचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला. बंगळूर कसोटीत हेन्रीने 8 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने 9 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या दिवशी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

सुंदरसाठी टीम इंडियाची वेगळीच चाल

मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक वेगळीच चाल केली जी दुसऱ्या कसोटीत प्रभावी ठरली. स्टार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करणे ही मोठी खेळी होती. पुण्यात दुसरी कसोटी सुरू झाली तेव्हा कुलदीप यादवच्या जागी कर्णधार रोहित शर्माने सुंदरला प्लेइंग-11 मध्ये घेतले. संधी मिळताच सुंदरने विकेट घेत न्यूझीलंडला गारद केले.  पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले. सर्व 10 विकेट वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंनी घेतल्या. ऑफस्पिनर सुंदरने 59 धावांत सर्वाधिक 7 बळी घेतले. अश्विनने 64 धावांत 3 बळी घेतले.

सुंदरकडून 5 क्लीन बोल्ड 

वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या पहिल्या डावात सुंदरने आपल्या गोलंदाजीने 5 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. हा देखील एक विक्रम आहे, तर 1 फलंदाज LBW आणि 1 झेल बाद झाला. यासह सुंदर पुण्याच्या मैदानावर 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

सुंदरने सात विकेट घेतल्या

नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. किवी संघाने एकवेळ बिनबाद 32 धावा केल्या होत्या, या धावसंख्येवर भारताला पहिले यश मिळाले. आश्विनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला (15) पायचीत केले आणि तो एलबीडब्ल्यू झाला. न्यूझीलंडला दुसरा धक्का विल यंगच्या (18) रूपाने पडला. जो अश्विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पंतने झेलबाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे (76) यांनी स्कोअरकार्ड 138 पर्यंत नेले. रचिन आणि कॉनवे सेटल झाल्याचंही वाटत होतं, पण अश्विन पुन्हा एकदा भारतासाठी ट्रबलशूटर ठरला आणि भारताची तिसरी विकेट मिळवली. रचिन रवींद्र पुण्यातही फॉर्मात होता, तो शतक करेल असे वाटत होते, पण तो वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला आणि 65 धावा करून क्लीन बोल्ड झाला.

यानंतर न्यूझीलंड संघाच्या खात्यात आणखी 4 धावा जमा झाल्या आणि यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल (3) 3 धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर सुंदरने डॅरिल मिशेलला (18) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स काही विशेष करू शकला नाही आणि त्यालाही सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 236/7 अशी होती. यानंतर सुंदरने टीम साऊदी (5), एजाज पटेल (4) आणि मिचेल सँटनर (33) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने 59 धावांत सात गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने तीन विकेट घेतल्या.

भारतातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावातील सर्व 10 बळी (स्पिनर)

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे 2024
  • भारत विरुद्ध इंग्लंड धर्मशाला 2024
  • भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई 1973
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई 1964
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकाता 1956
  • इंग्लंड विरुद्ध भारत कानपूर 1952

न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम आकडे (भारतीय गोलंदाज)

  • 8/72 एस. वेंकटराघवन दिल्ली 1965
  • 8/76 एरापल्ली प्रसन्न ऑकलंड 1975
  • 7/59 आर. अश्विन इंदूर 2017
  • 7/59 वॉशिंग्टन सुंदर पुणे 2024

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget