ऑस्ट्रेलियाच्या 'टेस्ट टीम ऑफ द ईयर'मध्ये विराट, बुमराहचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलाला दक्षिण आफ्रिकेचा खेळाड एबी डिविलिअर्सलाही या संघाच स्थान देण्यात आलं आहे. पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास यांचाही या संघाच समावेश करण्यात आला आहे.
![ऑस्ट्रेलियाच्या 'टेस्ट टीम ऑफ द ईयर'मध्ये विराट, बुमराहचा समावेश virat kohliand jaspreet bumrah in cricket australias test team of the year ऑस्ट्रेलियाच्या 'टेस्ट टीम ऑफ द ईयर'मध्ये विराट, बुमराहचा समावेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/02070650/virat-Kohli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नवीन वर्षात 2018 पेक्षा चांगली कामगिरी करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. मात्र विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने त्याआधीच इतिहास रचला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा आपल्या 'टीम ऑफ द ईयर'मध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे या ऑस्ट्रेलियन संघात ऑस्ट्रेलियाच्या एकाच खेळाडूचा समावेश आहे. केवळ नाथन लायनला या संघात स्थान मिळालं आहे.
लायन आणि भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकाचे दोन-दोन, श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडिज आणि पाकिस्तानच्या एक-एक खेळाडूचा समावेश या संघात करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन या संघाचा कर्णधार घोषित करण्यात आलं आहे. तर इंग्लंडचा जोस बटलर या संघाचा विकेटकीपर असणार आहे. श्रीलंकेचा कुशल मेंडिस, न्यूझीलंडचा टॉम लाथन यांना सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिविलिअर्सलाही या संघाच स्थान देण्यात आलं आहे.
इंग्लंडचा जोस बटलर, दक्षिण आफ्रिकेचा जेसन होल्डर, कगिसो रबाडा, पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास यांचाही या संघाच समावेश करण्यात आला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम ऑफ द ईयर : केन विलियमसन (कर्णाधार), विराट कोहली, कुशल मेंडिस, टॉम लाथम, एबी डिविलियर्स, जोस बटलर (विकेटकीपर), जेसन होल्डर, कगिसो रबाडा, नाथन लायन, मोहम्मद अब्बास आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)