एक्स्प्लोर

Virat Kohli : पहिल्यांदा किंग कोहलीच्या अफलातून फिल्डींगने बाजी पलटली अन् नंतर ट्राॅफी घेण्यासाठी सुद्धा हटके एन्ट्री!

वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीने अफलातून प्रय़त्न करत चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले.

Virat Kohli : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी (17 जानेवारी) खेळला गेलेला टी-20 सामना खूपच रोमांचक झाला. निकालासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागली. हा सामना केवळ शेवटच्या क्षणांमध्ये रोमांचक नव्हता तर सुरुवातीपासूनच या सामन्यात चढ-उतार होते.

टीम इंडियाने 22 धावांत 4 विकेट गमावून 200 चा टप्पा पार केला. रोहित शर्माने बऱ्याच कालावधीनंतर टी-20 मध्ये मोठी खेळी खेळली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सुद्धा बेधडक फलंदाजी केली. मोठी धावसंख्या उभारूनही टीम इंडिया प्रत्येक चौकार वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसली. किंग विराट कोहलीचा एक अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. त्याने दमदार क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाच्या 4 धावा वाचवल्या.

विराटचे अप्रतिम क्षेत्ररक्षण

अफगाणिस्तानला 20 चेंडूत 48 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने अशी उडी मारली की त्याने चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना केवळ दोन धावा करता आल्या. विराटचा हा प्रयत्न असा होता की संपूर्ण स्टेडियममध्ये त्याला टाळ्यांचा कडकडाट झाला. या फिल्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. विराटने हा षटकार वाचवला नसता तर कदाचित सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता आणि टीम इंडिया आधीच हरली असती, अशी स्थिती होती. 

या सामन्यात विराटने एक लांब धाव घेत शानदार झेल घेतला. असे अनेक प्रयत्न भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. कदाचित या प्रयत्नांमुळेच टीम इंडिया सामना बरोबरीत आणू शकला आणि नंतर विजयाची नोंद करू शकला.

ट्राॅफी स्वीकारण्यासाठी सुद्धा विराटची हटके एन्ट्री

विरोधी संघांवर नेहमी तुटून पडणारा विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भलत्याच मूडमध्ये दिसून आला. दोन ओव्हरच्या सुपर ओव्हर थरारानंतर सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने चषक स्वीकारला. यावेळी इतर खेळाडू विराटची वाट पाहत असताना विराटने दोन्ही पाय एकाचेवळी मुलांप्रमाणे घासत येत जागेवर आला. या घटनेचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget