एक्स्प्लोर
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना फायदा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. या क्रमवारीत विराट सर्वाधिक 922 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळवत आयसीसीच्या वन डे क्रमवारीत दुसरं स्थान कायम राखलं. त्याचबरोबर या विजयाचा टीम इंडियाच्या काही शिलेदारांना आयसीसीच्या क्रमवारीत बढती मिळाली आहे.
या विजयाने आयसीसीच्या क्रमवारीत न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतून भारतीय संघानं एका गुणाची कमाई केली. भारतीय संघाच्या खात्यात सध्या 122 गुण जमा आहेत.
आयसीसी क्रमवारीत महेंद्रसिंग धोनीला बढती
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर वन डे क्रमवारीतलं स्थानही तीन अंकांनी सुधारलं आहे. त्याने विसाव्या स्थानावरून सतराव्या स्थानावर झेप घेतली आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकली होती. तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने चांगला खेळ केला होता. याच बळावर धोनीने 3 स्थानांची झेप घेतली आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. या क्रमवारीत विराट सर्वाधिक 922 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. विराटपाठोपाठ भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत 854 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा अव्वल
टीम इंडियाचा शिलेदार जसप्रीत बुमरानं वन डे सामन्यांमधल्या गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं आहे. नंबर वन बुमराच्या खात्यात सर्वाधिक 808 गुणांची कमाई आहे.
टीम इंडियाची फिरकी जोडी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 6 स्थानांची बढती घेत 17वं स्थान गाठलं आहे.
अफगाणिस्तानचा रशिद खान दुसऱ्या स्थानावर असून, त्याच्या खात्यात 788 गुणांची नोंद आहे. न्य़ूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टनं भारताविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेत 12 विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 732 गुण आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement