Kapil Dev : 'गुलाबी आँखे' गाण्यावर कपिल देव यांचा पत्नीसमवेत भन्नाट डान्स; बर्थडे दिवशी जुना व्हिडिओ व्हायरल
Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी 6 जानेवारी रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली. वाढदिवस होऊन गेला मात्र, अजूनही कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे.
Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी 6 जानेवारी रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली. वाढदिवस होऊन गेला मात्र, अजूनही कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने कपिल देव यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये कपिल देव त्यांची पत्नी रोमी हिच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत.
कपिल देव (Kapil Dev) व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या पत्नीसमवेत एका स्टेपमध्ये डान्स करताना दिसत आहेत. विरोधी संघाला आपल्या गोलंदाजीने नाचवणाऱ्या कपिल देव यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते त्यांच्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद देत आहेत. त्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत.
'तगड्या' वेस्ट इंडिजची दहशत मोडून कपिल देव यांनी रचल होता इतिहास
वेस्ट इंडिजचे वर्चस्व संपवून भारतीय संघाने 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले होते. दोन वेळच्या जगज्जेत्याचा पराभव करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इतिहास रचलेला. त्यावेळी विश्वचषक जिंकल्याचा भारतीय संघातील खेळाडूंनाही काही वेळ विश्वास बसला नव्हता. क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या विडिंजचा सुपडा साफ करत तेव्हा भारताने चषक उंचावला होता. 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाला अतिशय दुबळं आणि कमकुवत समजले जात होते. पण कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने सर्वांनाच धक्का दिला देत नवा इतिहास रचला होता.
2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी निमंत्रण नसल्याने वाद
वर्ल्डकपबाबतचा सध्याचा चर्चेत असलेला वाद म्हणजे, वर्ल्डकपच्या फायनलसाठी देश-विदेशातीह अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु, देशाला पहिला वर्ल्डकप पटकावून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांना मात्र आमंत्रण नव्हतं. यावरुन बीसीसीआयच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
काय म्हणाले होते कपिल देव? (Kapil Dev)
कपिल देव म्हणाले की, "मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात."
इतर महत्वाच्या बातम्या