एक्स्प्लोर
बॉक्सर विकास क्रिशन ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर
रिओ दी जानेरो : भारताचा स्टार बॉक्सर विकास क्रिशनने रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यूपर्व फेरीचं तिकीट मिळवलं आहे. विकास क्रिशनने 75 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या सामन्यात तुर्कीच्या ऑन्डेर सिपालचा 3-0 असा धुव्वा उडवला.
या सामन्यात विकासने पहिल्या फेरीत 29 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या फेरीत विकासने खेळ अधिक उंचावला आणि सर्वाधिक 30 गुण वसूल केले. तिसऱ्या फेरीतही विकासने ऑन्डेर सिपालवर वर्चस्व गाजवलं आणि सामना 3-0 असा खिशात टाकला.
आता उपांत्यपूर्व फेरीत विकाससमोर उझबेकिस्तानच्या बेक्तीमिर मेलिकुझिव्हचं आव्हान असून हा सामना भारतीय वेळेनुसार 16 ऑगस्टला पहाटे साडेतीन वाजता खेळवला जाईल. जर विकासने हा सामना जिंकला तर बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement