एक्स्प्लोर
तुफान फॉर्ममधील मुंबई संघात मोठा बदल, रहाणेऐवजी धवल कर्णधार
विजय हजारे चषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने टीममध्ये मोठा बदल केला आहे.
मुंबई: विजय हजारे चषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने टीममध्ये मोठा बदल केला आहे. मुंबईने पुढील दोन सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेऐवजी धवल कुलकर्णीवर सोपवली आहे.
वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे भारताच्या बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हनकडून खेळणार आहे. रहाणेशिवाय मुंबईचे श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे सुद्धा बोर्ड इलेव्हनमध्ये असतील. मुंबईचे हे तिन्ही खेळाडू विजय हजारे चषकात भन्नाट फॉर्ममध्ये आहेत.
दरम्यान, रहाणे आणि अय्यरच्या जागी अखिल हेरवाडकर आणि शुभम रंजन यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पृथ्वी शॉच्या जागी अद्याप कोणत्या खेळाडूच्या नावाची घोषणा झालेली नाही.
मुंबईने विजय हजारे चषकात सलग तीन सामने जिंकले आहेत. मुंबईचा चौथा सामना विदर्भाशी होता, मात्र पावसामुळे तो रद्द झाला.आता मुंबईचा चौथा सामना 28 सप्टेंबरला पंजाबविरुद्ध आणि 30 सप्टेंबर हिमाचल प्रदेशशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात धवल कुलकर्णी मुंबईचं नेतृत्त्व करेल.
धवल कुलकर्णी हा मुंबईचा अनुभवी खेळाडू आहे. त्याला आदित्य तरे आणि सूर्यकुमार यादव यांची साथ मिळेल.
संबंधित बातम्या
श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉचा धमाका, वन डेत सहा वर्षांनी 400 धावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement