एक्स्प्लोर

Loan : अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत? वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या

Loan : अनेकदा आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास तातडीनं कर्ज काढावं लागतं. पैशांची गरज भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज किंवा टॉप अप लोन काढण्याचा विचार केला जातो.

नवी दिल्ली : अनेकांना आर्थिक अडचणींमुळं वैयक्तिक कर्ज काढावं लागतं. एखाद्या व्यक्तीचं अगोदर काढलेलं वैयक्तिक कर्ज सुरु असताना पुन्हा एकदा पैशांची गरज निर्माण झाल्यास आणखी एका वैयक्तिक कर्ज काढंव लागतं. याशिवाय आणखी एक पर्याय असतो तो म्हणजे अगोदर सुरु असलेल्या पर्सनल लोनवर टॉप अप लोन काढावं लागतं. या दोन्हीमध्ये फायदे आणि नुकसान देखील असतं. 

टॉपअप लोन म्हणजे काय? 

टॉप अप लोन म्हणजे असं कर्ज जे तुमच्या अगोदरच्या पर्सनल लोनवर बँक किंवा एनबीएफसीकडून ज्याची ऑफर दिली जाते. सामान्यपणे बँक किंवा एनबीएफसी चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना टॉप अप लोनची ऑफर करतात. जे कर्ज तुम्हाला पहिल्यापासून सुरु असलेल्या कर्जावर मिळतं. याचं कारण बँक किंवा एनबीएफसीकडे कर्जदाराची सर्व माहिती उपलब्ध असते. त्यामुळं टॉप अप लोन मंजूर होण्यास अधिक वेळ लागत नाही. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अगोदरच्या वैयक्तिक कर्जापेक्षा नव्या वैयक्तिक कर्जाचा व्याज दर कमी असतो. 

नव्या वैयक्तिक कर्जाच्या अटी

तुम्हाला नव्या वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी नव्यानं कर्जासाठी अर्ज करावा लागतो. तुम्हाला एखाद्या बँक किंवा एनबीएफसीकडे वैयक्तिककर्जासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर वित्तीय संस्था कर्जदाराची पात्रता पाहते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्जाचा अर्ज मंजूर होते. नव्या वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग शुल्क द्यावं लागतं. यासाठी व्याजदर देखील जास्त असतो. हे कर्ज महाग असतं. 

कर्ज घेण्यापूर्वी काय करावं?

जाणकारांच्या मते जर तुमचं अगोदरचं वैयक्तिक कर्ज सुरु असेल आणि वेळेवर ईएमआय भरत असाल आणि टॉप अप लोन पहिल्या व्याज दरापेक्षा कमी व्याज दरानं मिळेल. नवं वैयक्तिक कार्ज काढण्यापूर्वी बँकेसोबत टॉप अप कर्जाबाबत चर्चा केली पाहिजे, ज्या बँकेकडून पर्सनल लोन काढलं आहे त्यांच्यासोबत चर्चा करावी. बँक जर तुम्हाला टॉप अप लोन द्यायला तयार असेल तर किती रकमेचं कर्ज देते याची चौकशी केली पाहिजे. बँक देत असलेल्या कर्जामुळं तुमची गरज भागत नसल्यास नव्या वैयक्तिक कर्जाचा विचार केला पाहिजे. 

क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते नव्या वैयक्तिक कर्ज किंवा टॉप अप लोनचा विचार करावा जेव्हा तुमच्यापुढं दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसेल. अधिक पर्सनल लोन किंवा टॉप अप लोनचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. कर्जाची परतफेड जशी केली जाते त्याप्रमाणं क्रेडिट स्कोअर वाढत जातो.

महत्त्वाच्या बातम्या

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी, तर चांदी 10 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Embed widget