US Open 2021: जोकोविच 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण करण्याच्या जवळ, यूएस ओपनची उपांत्यपूर्व फेरी जिंकली
US Open 2021: जागतिक नंबर एक असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच 'करिअर ग्रँड स्लॅम' आणि त्याच्या विक्रमातील 21 व्या ग्रँडस्लॅमपासून फक्त तीन विजय दूर आहे. आज जोकोविचने जेन्सन ब्रुक्सबीचा पराभव केला.
US Open 2021: जगातील महान टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. यासह, तो 'करिअर ग्रँड स्लॅम' आणि त्याच्या विक्रमातील 21 व्या ग्रँडस्लॅमपासून केवळ तीन विजय दूर आहे. आज खेळल्या गेलेल्या फायनल -16 व्या सामन्यात जोकोविचने अमेरिकन टेनिसपटू जेन्सन ब्रुक्सबीचा 1-6, 6-3, 6-2, 6-2 असा चार सेटमध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचचा सामना इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीशी होईल. या वर्षी हे दोन खेळाडू ग्रँड स्लॅममध्ये दोनदा ऐकमेकांसमोर आले आहेत, जिथं जोकोविच दोन्ही वेळा जिंकला आहे.
आज खेळलेल्या या सामन्यात जेन्सन ब्रुक्सबीने चांगली सुरुवात केली आणि पहिला सेट 1-6 ने जिंकत जोकोविचवर दबाव आणला. मात्र, त्यानंतर जोकोविचने पुढील तीन सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि सामना सहज जिंकला. यासह जोकोविचने कारकीर्द ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.
Another dub for the best player in the world.
— US Open Tennis (@usopen) September 7, 2021
Novak Djokovic overcomes a hot start from Jenson Brooksby to reach the quarterfinals! #USOpen pic.twitter.com/NsmFr1TbiT
ब्रुकस्बीने पहिला सेट 29 मिनिटांत जिंकला
99 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रुक्सबीने सुरुवातीलाच जबरदस्त फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. त्याच्या मजबूत ग्राउंडस्ट्रोक्समुळे त्याने पहिला सेट अवघ्या 29 मिनिटांत 1-6 ने जिंकला. मात्र, यानंतर जोकोविचने आपल्या लयीत पुनरागमन केले आणि दुसरा सेट 6-3 ने जिंकला. ब्रूकस्बीने सामन्यात पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला पण जोकोविचचा अनुभव आणि अचूक खेळ यांच्यासमोर तो असहाय्य होता. जोकोविचने तिसरा आणि चौथा सेट 6-2, 6-2 च्या फरकाने जिंकत सामना सहज जिंकला.
जोकोविचला यूएस ओपन जिंकताना दोन विशेष विक्रम आपल्या नावे करणार
जर जोकोविचने ही स्पर्धा जिंकली, तर त्याच्या नावावर दोन विशेष विक्रम नोंदवले जातील. जोकोविचने वर्षातील पहिले तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. आता जर त्याने इथेही विजेतेपद पटकावले तर टेनिसमध्ये 52 वर्षानंतर 'कॅलेंडर इयर ग्रँड स्लॅम' पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियाचा महान टेनिसपटू रॉड लेव्हरने 1969 मध्ये हा पराक्रम केला. यासह जोकोविचची नजर त्याच्या कारकिर्दीतील 21 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावरही असेल. जर नोवाकने येथे विजेतेपद पटकावले तर तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल आणि रॉजर फेडररच्या पुढे असेल. तिघांच्या नावावर 20-20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.