Hardik Pandya : हार्दिक पांड्या मागच्या दाराने कॅप्टन झाला, पण रोहितच्या चाहत्यांचा संताप मुंबई विमानतळावर याचि देही याची डोळा पाहिला!
'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा चाहते हार्दिकच्या डोळ्यादेखत देत असल्याचे दिसून येत आहेत. घोषणा ऐकून हार्दिकचा चेहरा रागावलेला दिसत असला, तरी तो कटाक्ष टाकून निघून जाताना दिसून येते.
Hardik Pandya : अलीकडेच हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आल्यानंतर सुरु असलेला चाहत्यांच्या वादाचा धुरळा अजूनही खाली बसलेला नाही. चाहत्यांकडून रोहित शर्माला हटवण्यात आल्यानंतर संताप सुरुच आहे. आयपीएल लिलावात मुंबई संघमालक आकाश अंबानी यांना सुद्धा चाहत्यांनी जाब विचारला होता. हा सर्व प्रकार ताजा असतानाच आता मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
'मुंबईचा राजा रोहित शर्मा' घोषणांनी मुंबई विमानतळ दणाणलं!
व्हायरल व्हिडिओत हार्दिक पांड्या मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर चाहते (People are shouting in front of Hardik Pandya Mumbai Cha Raja Rohit Sharma) घोषणा देताना दिसून येत आहेत. 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा चाहते हार्दिकच्या डोळ्यादेखत देत असल्याचे दिसून येत आहेत. घोषणा ऐकून हार्दिकचा चेहरा रागावलेला दिसत असला, तरी तो त्यांच्याकडे कटाक्ष टाकून निघून जाताना दिसून येते.
People are shouting 'Mumbai Cha Raja Rohit Sharma' infront of Hardik Pandya.
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) December 21, 2023
Rohit Sharma is an emotion of India.🐐
SHAMELESS MUMBAI INDIANS pic.twitter.com/qp5P8O30VF
हार्दिक 2024 पूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडू शकतो?
दुसरीकडे, हार्दिक पांड्याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये तो आयपीएल 2024 मधून बाहेर पडू शकतो असे सांगण्यात आले आहे. आयपीएलपूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या बाहेर पडणार, जवळपास निश्चित आहे. आता बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी समोर आली आहे की हार्दिक 2024 पूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडू शकतो.
बीसीसीआयच्या एका सूत्राने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर आहे आणि तो संपूर्ण आयपीएल 2024 मधून बाहेर जाऊ शकतो. जर हार्दिक आयपीएलमधून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल, कारण मुंबईने प्रथम त्याच्याशी रोख व्यवहार केला आणि नंतर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवले. मात्र, अद्याप बीसीसीआय किंवा मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
वर्ल्ड कप 2023 मध्ये दुखापत
नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये हार्दिकला दुखापत झाली होती. या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात हार्दिकच्या टाचेला दुखापत झाली होती, त्यानंतर तो अद्याप बरा होऊ शकलेला नाही. आता हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पांड्याची आयपीएल कारकीर्द
हार्दिक पांड्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 115 डावात फलंदाजी करताना त्याने 30.38 च्या सरासरीने आणि 145.86 च्या स्ट्राईक रेटने 2309 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 10 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत 33.26 च्या सरासरीने 53 बळी घेतले आहेत.