Avani Lekhara Wins Bronze : अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं, भारताचं बारावं पदक
Tokyo Paralympics 2020 : सध्या सुरु असलेल्या 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. अवनीनं (Avani Lekhara)50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे.
Tokyo Paralympics 2020 : टोकियोमध्ये सध्या सुरु असलेल्या 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिंपिक्स (Tokyo Paralympics) मध्ये भारतानं 12वं पदक जिंकलं आहे. हे पदक भारताला मिळवून दिलं आहे ते अवनी लेखरानं. अवनीनं 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. अवनीनं या स्पर्धेत हे दुसरं पदक जिंकलं आहे. याआधी तिनं याच स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.
Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal
— ANI (@ANI) September 3, 2021
(file photo) pic.twitter.com/IeTAe6exKg
पॅरालिम्पिकमध्ये अवनीची 'सुवर्ण' भरारी
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. आधी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली. अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
प्रवीणकुमारनं जिंकलं रौप्यपदक
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पदकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या प्रवीण कुमारनं हाय जंप (उंच उडी) T64 प्रकाराच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक खेळांच्या सुरुवातीपासून प्रवीण कुमारला हाय जंप प्रकारात पदकाचा प्रवळ दावेदार समजलं जात होतं. प्रवीण कुमारनं सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत रौप्य पदकावर नाव कोरलं. एवढंच नाहीतर त्यानं उत्तम गुणांची कमाई करत आपला एशियन रेकॉर्डही कायम ठेवला आहे. प्रवीण कुमारनं आपल्या तीन प्रयत्नांमध्ये सातत्यानं सुधारणा केली. प्रवीण कुमारनं आपल्या पहिल्या प्रयत्नात 1.83 मीटर उंच उडी घेतली. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 1.93 मीटर उंच उडी घेतली. तर तिसऱ्या प्रयत्नात प्रवीण कुमारनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत 2.07 मीटर उंच उडी घेतली.