Rohit Sharma : रोहितचा सिक्स बघून चकित झालेल्या अंपायरनं विचारला प्रश्न आणि रोहितचं सुद्धा दिलखुलास उत्तर! दोघांमध्ये संवाद घडला तरी काय?
रोहितने तब्बल सहा षटकार खेचत पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले. त्याचे अनेक षटकार गगनचुंबी होते. त्याचे सिक्स बघून मैदानावरील अंपायर सुद्धा गोंधळून जाण्याची वेळ आली.
अहमदाबाद : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) पाकिस्तानविरुद्धच्या (India Vs Pakistan) हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरशः लोळविताना दमदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार गोलंदाजांसह टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा राहिला. त्याने 63 चेंडूत 86 धावांची खेळी करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. रोहितने तब्बल सहा षटकार खेचत पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले. त्याचे अनेक षटकार गगनचुंबी होते. त्याचे सिक्स बघून मैदानावरील अंपायर सुद्धा गोंधळून जाण्याची वेळ आली. त्यामुळे या मॅच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तुझ्या बॅटमध्ये काही आहे का?
यामध्ये अंपायर मराईस रोहित शर्माकडे पाहताना दिसून येत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमका संवाद चालला आहे तरी काय? ते जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये होती. हा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर रोहित शर्माने या आता दोघांमध्ये झालेल्या संवादाचा खुलासा केला आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याने रोहित शर्माला तो प्रसंग नेमका काय होता अशी विचारणा केली. त्यावेळी रोहित शर्माने दोघांमध्ये संवाद काय झाला? याचा खुलासा केला. तो म्हणाला की, अंपायर मला विचारत होते की एवढे गगनचुंबी षटकार मारतोस तरी कसे? तुझ्या बॅटमध्ये काही आहे का? तर मी त्याला म्हणालो की बॅटमध्ये काहीच नाही ती फक्त माझी ताकद आहे.
Rohit Sharma said, "the umpire asked me, how am I hitting such big and effortless sixes. Is it because of the bat? I told him it's not my bat, it's my power (laughs)". pic.twitter.com/T8z5K12mho
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 15, 2023
हिटमॅन रोहितचा धावांचा पाऊस
रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरल्यानंतर मागील दोन सामन्यांमध्ये त्याने धुवाँधार खेळी केली आहे. अफगानिस्तानविरुद्ध शतक ठोकतानाच पाकिस्तान विरुद्धही 86 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा हा वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप तीनमध्ये पोहोचला आहे. रोहितने तीन सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत. त्यानंतर डेव्हिड कॉनवे हा दुसऱ्या नंबर वरती आहे, तर पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान हा 248 धावांसह पहिल्या नंबरवर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या