एक्स्प्लोर

England vs Afghanistan : नवखा अफगाणिस्तान बलाढ्य विश्वविजेत्या साहेबांवर तुटून पडला! नोंदवली पाॅवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या!

अफगाणिस्तानने पहिल्या पंधरा शतकांमध्येच नाबाद नावात 111 धावा करत इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. अखेर आदिल रशीदने 28 धावांवर इब्राहिम झरदानला बाद करत सलामीची जोडी फोडली.

नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) आज इंग्लंडची लढत तुलनेत दुबळे असलेल्या अफगाणिस्तानविरोधात (England vs Afghanistan) होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्योस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली.  अफगाणिस्तानला फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर अफगाणिस्तानने चौफेर फटकेबाजी करताना दमदार सुरुवात केली.  त्यामुळे त्यांनी आजवरची पॉवर प्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. सलामीवीर रहमदुल्लाह गुरबाजने धुवाँधार खेळी करताना अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्यामुळे 13 व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लागले. यामध्ये गुरुबाजच्या 67 धावांच्या खेळीचा समावेश होता.

अफगाणिस्तानने पहिल्या पंधरा शतकांमध्येच नाबाद नावात 111 धावा करत इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. अखेर आदिल रशीदने 28 धावांवर इब्राहिम झरदानला बाद करत सलामीची जोडी फोडली. दोघांनी 18.4 षटकांत 122 धावांची सलामी दिली. तत्पूर्वी, दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. 

WC मध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक पॉवरप्ले धावसंख्या

  • 79/0 वि. इंग्लंड, 2023*
  • 61/0 वि. न्यूझीलंड, 2019
  • 50/1 वि. बांगलादेश, 2023
  • 48/0 वि. बांगलादेश, 2019
  • 40/1 वि. भारत, 2023

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या सलामीवीरांसाठी 50+ स्कोअर

  • 62 - रहमत शाह विरुद्ध WI, लीड्स, 2019
  • 51 - जावेद अहमदी विरुद्ध SCO, ड्युनेडिन, 2015
  • 50* - रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध ENG, दिल्ली, 2023*

 इंग्लंडचा इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय

दरम्यान, मागील लढतीत डेविड मलानने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 140 धावा आणि रीस टोपलीने घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर बांगलादेशचा 137 धावांनी धुव्वा उडवत इंग्लंडने (ICC Cricket World Cup 2023) पहिला विजय नोंदवला होता. इंग्लंडचा हा वर्ल्डकपच्या इतिहासातील चौथा मोठा विजय ठरला. टूर्नामेंटच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने नऊ विकेट्सने पराभूत केल्यामुळे इंग्लंडवर दबाव होता. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 364 धावांची मजल मारली. मलानने 140 धावांची खेळी करताना जॉनी बेअरस्टो (52) आणि जो रूट (82) यांच्यासोबत शतकाहून अधिक भागीदारी केली. स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळत असलेल्य वेगवान गोलंदाज टाॅपलीने (4-43) याने पहिल्या सहा षटकांमध्ये बांगलादेशच्या आघाडीची फळी तंबूत पाठवली आणि इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. बांगलादेशचा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 227 धावांत आटोपला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget