Carlos Alcaraz: वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं; कार्लोस अल्कराझची अनेक विक्रमांना गवसणी
US Open 2022: स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझनं (Carlos Alcaraz) वयाच्या 19 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय.
US Open 2022: स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझनं (Carlos Alcaraz) वयाच्या 19 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय. त्यानं यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात नार्वेच्या कॅस्पर रुडचा (Casper Ruud) पराभव करत पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलंय. वयाच्या 19 व्या वर्षी जेतेपद जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. यासह त्यानं जागतिक टेनिस क्रमवारीतही अव्वल स्थानी झेप घेतलीय.
यूएस ओपनच्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराझसमोर 23 वर्षीय कॅप्सर रुडचं आव्हान होतं. तमाम टेनिस प्रेक्षक आणि चाहत्यांचं लक्ष लागून असलेल्या या अंतिम सामन्यात अल्काराझनं जबरदस्त ताकद आणि नेटवर प्रभावशाली खेळाचं प्रदर्शन केलं. या सामन्यात कार्लोस अल्कराझनं कॅस्पर रुडचा 6-4, 2-6, 7-6. 6-3 असा पराभव केलाय. अल्काराझ हा स्टार टेनिसपटू राफेल नदालनंतर 19 व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरलाय.
अव्वल स्थानी झेप घेणारा सर्वात तरूण खेळाडू
कार्लोस अल्कारेझ हा टेनिसमध्ये अव्वल स्थानी झेप घेणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. एवढंच नव्हे तर, यूएस ओपनला तब्बल 32 वर्षांनंतर सर्वात तरुण चॅम्पियन मिळाला आहे. कार्लोस अल्कराझ आणि कॅस्पर रुड या दोघांना नंबर वन होण्याची संधी होती. यूस ओपनचा अंतिम सामना जिंकणारा अव्वल स्थानावर कब्जा करणार होता. ही लढत जिंकत कार्लोस अल्कराझ जिंकली.
यूएस ओपनचं खिताब जिंकणारा दुसरा सर्वात तरूण टेनिसपटू
टेनिसच्या खेळात अमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. पीट सॅम्प्रासनंतर कार्लोस अल्कराझ हा यूएस ओपनचे जेतेपद पटकावणारा दुसरा सर्वात तरूण टेनिसपटू ठरलाय. पीट सॅम्प्रासनं 1990 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.
एटीपी क्रमवारीत सर्वात तरुण नंबर वन खेळाडू बनण्याचा मान
कार्लोस अल्कराझने 1973 पासून एटीपी क्रमवारीत सर्वात तरुण नंबर वन खेळाडू बनण्याचा मान मिळवलाय. हा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन हेविटच्या नावावर आहे. हेविट 19 नोव्हेंबर 2001 रोजी वयाच्या 20 वर्षे 8 महिने 23 दिवसात सर्वात तरुण नंबर वन टेनिसपटू बनला होता. परंतु, कार्लोस अल्कराझच्या नावावर या विक्रमाची नोंद झालीय.
हे देखील वाचा-