Team India T20 World Cup : मुंबईच्या निर्णयाचा परिणाम टीम इंडियावर होणार? टी-20 वर्ल्डकपसाठी पहिल्या पसंतीचे उत्तर मिळाले!
Team India T20 World Cup : एका अहवालानुसार, मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचा टीम इंडियावर कोणताही परिणाम होणार नसून टी-20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला पहिली पसंती असेल.
Rohit Sharma : गेल्या आठवड्यातच आयपीएलच्या (IPL 2024) मुंबई फ्रँचायझीमध्ये (Mumbai Indians) मोठा बदल झाला. फ्रँचायझीने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी आपल्या संघाची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya सोपवली. यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, एका अहवालानुसार, मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचा टीम इंडियावर कोणताही परिणाम होणार नसून टी-20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला पहिली पसंती असेल.
दैनिक जागरणने बीसीसीआयच्या सूत्राच्या हवाल्याने दुजोरा दिला आहे. प्रकरणाची परिस्थिती स्पष्ट केली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार असेल का? असे विचारले असता, त्याने स्पष्टपणे 'नाही' म्हटले. त्यांनी सांगितले की, 'हा' (रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवणे) हा फ्रँचायझीचा निर्णय होता आणि त्यामुळे टीम इंडियासाठी घेतलेल्या निर्णयांवर कोणताही फरक पडू नये. रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल.
Sanjay Manjrekar said "Rohit Sharma will be the same batter, excited to see him as pure batter, I just hope Hardik doesn't feel the pressure - he is a proven leader, it makes lots of cricket sense to bring in Hardik Pandya". [Star Sports] pic.twitter.com/cyB1GtuUh9
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2023
आढावा बैठकीनंतर भविष्यातही रोहितचे कर्णधारपद निश्चित
या वृत्तपत्राने यापूर्वी 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या कर्णधारपदाबाबत खुलासा केला होता. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर बीसीसीआयची आढावा बैठक झाली तेव्हा त्यात टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान रोहित शर्माने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे विचारले होते की, बोर्ड त्याला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाहतो का? रोहितने बोर्ड अधिकाऱ्यांना असेही विचारले होते की, जर त्याची 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या योजनांमध्ये गणना केली जात असेल, तर आतापासून याबद्दल माहिती द्यावी.
रोहितच्या या प्रश्नाला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समिती आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. सर्वांनी एकमताने सांगितले होते की, सध्या फक्त रोहितच तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
इतर महत्वाच्या बातम्या