एक्स्प्लोर

Taipei Open 2022: पारुपल्ली कश्यपचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, प्रियांशू रजावत आणि मिथुन मंजुनाथचंही दमदार प्रदर्शन

Taipei Open 2022: भारताचा बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनं (Parupalli Kashyap) तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय.

Taipei Open 2022: भारताचा बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनं (Parupalli Kashyap) तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 40 व्या स्थानावर असलेल्या पारुपल्ली कश्यपनं चीनच्या तैपेईच्या ची यू जेनचा 24-22, 21-10 असा पराभव केलाय. याशिवाय किरण जॉर्ज (Kiran George),  मिथुन मंजूनाथ (Mithun Manjunath), प्रियांशु रजावत (Priyanshu Rajawat) आणि समिया इमाद फारूकीनंही (Samiya Farooqui) दमदार प्रदर्शन करत आपपला सामना जिंकलाय. 

कश्यपचं दमदार प्रदर्शन
पहिल्या सेटमध्ये चीनच्या जी यू जेननं कश्यपला कडवी टक्कर दिली. परंतु, कश्यपनं दमदार प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये 24-22 मध्ये विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कश्यपनं आपलं वर्चस्व कायम राखत आघाडी घेतली. त्यावेळी जेनला गुण मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय. कश्यपनं विजयाची घोडदौड कायम ठेवत सामना जिंकला. कश्यपचा पुढील सामना चायनीज तैपेई बॅडमिंटनपटू चिया हाओ लीशी होणार आहे.

किरण जार्ज, मिथुन मंजूनाथ, प्रियांशू रजावतची चकमदार खेळी
जागतिक क्रमावारीत 70 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू किरण जार्जनं अजरबॅजनच्या आदे रेस्की ड्विकाहयोचा 23-21, 21-17 असं नमवून सामना जिंकला. तर, पुरूषाच्या एकेरी सामन्यात भारताच्या बॅडमिंटनपटू मिथुन मंजूनाथनं डेनमार्कच्या किम ब्रुमचा 21-17, 21-15 असा पराभव केला. तसेच जागतिक क्रमावरीत 84 व्या क्रमांकावर असलेल्या प्रियांशु रजावतनं चीनी तैपईच्या यू सेन्ग पो विरुद्ध विजय मिळवला. त्यानं यू सेन्ग पोविरुद्ध 21-16, 21-15 असा सामना जिंकलाय.

सामिया इमाद फारूकीनंही दाखवला दम
तैपई ओपन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटू सामिया इमाद फारूकीनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. महिला एकेरी स्पर्धेत तिनं मिलेशियाच्या किसोना सेव्हादुरैला 21-15, 21-11 असं नमवलंय. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget