एक्स्प्लोर

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; 6 जूनला खेळणार शेवटचा सामना, चाहते भावूक

Sunil Chhetri Retirement: भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. भारतीय दिग्गज म्हणून ओळख असलेल्या सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे. 

Indian Men's Football Team Captain Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले. भारत आणि कुवेत यांच्यात विश्वचषक पात्रता फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे. भारतीय दिग्गज म्हणून ओळख असलेल्या सुनील छेत्रीचा हा शेवटचा सामना ठरणार आहे. 

सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिलेली आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने 93 गोल केले. पण त्याने आता निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. एक्स (आधीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असं म्हणत सुनील छेत्रीने जवळपास 9 मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

सुनील छेत्री भावूक- (Sunil Chhetri Retirement)

सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो निवृत्तीची घोषणा करताना खूपच भावूक असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो. खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्रीने सांगितले. 

'गेल्या 19 वर्षांच्या माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी...'

या व्हिडीओमध्ये सुनील छेत्री म्हणतोय की, गेल्या 19 वर्षांतील माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे कर्तव्य, दबाव आणि अपार आनंद. वैयक्तिकरित्या, मी कधीही विचार केला नाही की मी देशासाठी खेळलेला हा खेळ आहे, जेव्हा मी राष्ट्रीय संघासह प्रशिक्षण घेतो तेव्हा मला त्याचा आनंद मिळतो.  सुनील छेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. 

इतर बातम्या:

IPL 2024: यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?; ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!

ICC T-20 World Cup 2024: दोनदा टोलावले 6 चेंडूत 6 षटकार; 9 चेंडूत अर्धशतक; टी-20 विश्वचषकात या खेळाडूवर असेल सर्वांचं लक्ष!

किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget