सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, "धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी"
निवृत्तीनंतर धोनीची सर्वश्रुत असलेली 7 नंबरची जर्सी आता कोण घालणार? धोनी क्रिकेट कोचिंग करणार की शेती करणार? या सर्व चर्चांदरम्यान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. काल 7.29 मिनिटांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत धोनीना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी विविध प्रकारे पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र आता धोनी निवृत्तीनंतर काय करणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
धोनीची सर्वश्रुत असलेली 7 नंबरची जर्सी आता कोण घालणार? धोनी क्रिकेट कोचिंग करणार की शेती करणार? या सर्व चर्चांदरम्यान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे.
MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
निवृत्तीनंतर धोनीला अनेक प्रकारच्या ऑफर्स येत असतील. त्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, इतर कोणत्या गोष्टीतून नाही. संकटांशी लढण्याचा त्याचा स्वभाव आहे. एका टीमचं नेतृत्व करण्याची क्षमता धोनीने क्रिकेटमध्ये दाखवली आहे, त्याची सार्वजनिक जीवनात गरज आहे. त्यामुळे धोनीने 2024 ची निवडणूक लढली पाहिजे."
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते...
धोनीनं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
संबंधित बातम्या
- Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
- MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
- महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते...
- MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं