एक्स्प्लोर

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते....

'आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताना तू तुझ्या डोळ्यातील अश्रूंना थांबवलं असशील', महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या या घोषणेनंतर पत्नी साक्षीनंदेखील त्याच्या निवृत्तीवर भावनिक पोस्ट केली आहे. साक्षीने इन्स्टाग्रामवर लिहलं आहे की, 'तू जे काही मिळवलं आहे त्याचा तुला गर्व असला पाहिजे. क्रिकेटला आपले सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल तुझं अभिनंदन. तुझ्या कर्तृत्वाचा आणि तुझ्यातील व्यक्तीचा मला अभिमान आहे. मला माहित आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताना तू तुझ्या डोळ्यातील अश्रूंना थांबवलं असशील. भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. #thankyoumsd #proud'.
धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहलीने धोनीला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज (15 ऑगस्टला) महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  धोनी आयपीएल खेळत राहणार आहे. धोनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget