एक्स्प्लोर
Advertisement
MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक
MS Dhoni Retirement Announcement: महेंद्र सिंह धोनी आपली निवृत्ती घोषित करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मै पल दो पल का शायर हूँ असे म्हणत धोनीने आपल्या सहकाऱ्यांसोबतचे क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ही निवृत्ती जाहीर करताना त्याने एक भावनिक गाणं शेअर करत जुन्या आठवणी उजाळा दिला आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. अशाच आठवणी धोनीच्याही आहेत. त्याने भारतीय क्रिकेट संघात खेळायला सुरुवात केल्यापासून अखेरचा सामना. या काळातील आपल्या सहकाऱ्यांसोबतचे सर्व क्षण त्याने व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या व्हिडीओला मैं पल दो पल का शायर हूँ, असं गाणं आहे.
मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए कुछ आहें भर कर लौट गए, कुछ नग्में गा कर चले गए वो भी एक पल का किस्सा थे, मैं भी एक पल का किस्सा हूँ कल तुम से जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूँ मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ कल और आयेंगे नग्मों की खिलती कलियाँ चुननेवाले मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे मसरूफ ज़माना मेरे लिए, क्यों वक्त अपना बरबाद करे मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है मैं पल दो पल का शायर हूँ इथं प्रत्येकजण काही क्षणांसाठी आलेला असतो. माझी गोष्टही तशीच छोटीशी आहे. उद्या माझ्या जागी आणखी कोणीतरी चांगला येईल. या व्हिडीओत अगदी माजी कर्णधार सौरभ गांगुली, मास्टर ब्लास्टर सिचन तेंडुलकर, राहुल द्रविड, युवराज सिंह पासून विराट कोहली पर्यंत सर्व नवे जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास 2019 विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. 2019 विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु, विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतु, धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.View this post on InstagramThanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement