(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH vs KKR: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास, आयपीएलमध्ये असे करणारा तो पहिला परदेशी फलंदाज
कोलकाता विरुद्ध नाबाद 47 धावा करणारा डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारा पहिला परदेशी फलंदाज ठरला आहे.
SRH vs KKR: आयपीएल 2020 च्या 35 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना कोलकाताने 20 षटकांत पाच गडी गमावून 163 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल हैदराबाद संघानेही निर्धारित षटकांत सहा गडी गमावून 163 धावा केल्याने मॅच टाय झाली. परिणामी हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता जिंकला.
या सामन्यात हैदराबाद सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 33 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. या दरम्यान त्याने पाच चौकारही लगावले. कोलकाता विरुद्धच्या या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला असला तरी वॉर्नरने या सामन्यात इतिहास रचला आहे.
वॉर्नर आता आयपीएलमध्ये 5,000 धावा पूर्ण करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज आहे. त्यांच्या आधी सुरेश रैना, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.
IPL 2020, KKRvsSRH : कोलकाताची सुपरओव्हमध्ये हैदराबादवर मात, लॉकी फर्ग्युसन विजयाचा हिरो
आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावे आता 135 सामन्यात 43.05 च्या सरासरीने आणि 141.05 च्या स्ट्राईक रेटने 5037 धावा केल्या आहेत. वॉर्नरने आयपीएलमध्ये चार शतके आणि 46 अर्धशतके झळकावली आहेत.
कोहलीला टाकले मागे
वॉर्नरने आयपीएलच्या 135 डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या, तर विराट कोहलीने 147 डावांमध्ये हा पराक्रम केला. अशावेळी वेगवान पाच हजार धावा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वॉर्नरने कोहलीला मागे सोडले आहे.
आयपीएलच्या इतिहासात 5000 धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली - 5759 धावा
- सुरेश रैना - 5368 धावा
- रोहित शर्मा - 5157 धावा
- डेविड वॉर्नर - 5037 धावा