(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020, KKRvsSRH : कोलकाताची सुपरओव्हमध्ये हैदराबादवर मात, लॉकी फर्ग्युसन विजयाचा हिरो
हंगामाचा पहिला सामना खेळत फर्ग्युसनने शानदार कामगिरी केली. प्रथम त्याने आपल्या चार षटकांत अवघ्या 15 धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. यानंतर फर्ग्युसनने सुपर ओव्हरमध्येही दोन विकेट घेतल्या.
IPL 2020, KKRvsSRH : आयपीएल 2020 च्या 35 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत कोलकाताने 20 षटकांत पाच गडी गमावून 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादनेही 20 षटकांत सहा गडी गमावून 163 धावा केल्या. अशाप्रकारे, सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवली गेली. ज्यामध्ये कोलकाताचा विजय झाला.
कोलकाताच्या या विजयात वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हीरो ठरला. सीजनमधील पहिला सामना खेळत फर्ग्युसनने शानदार कामगिरी केली. प्रथम त्याने आपल्या चार षटकांत अवघ्या 15 धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. यानंतर फर्ग्युसनने सुपर ओव्हरमध्येही दोन विकेट घेतल्या.
सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करत अवघ्या दोन धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर लॉकी फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अब्दुल समदने दोन धावा घेतल्या. तिसर्या बॉलवर फर्ग्युसनने समदलाही बोल्ड केले. अशा प्रकारे हैदराबादने कोलकाताला सुपर षटकात तीन धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य कोलकाताने सहज पार करत सामना जिंकला.
त्याआधी कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी सहा षटकांत 48 धावांची भागीदारी केली. त्रिपाठीने 16 चेंडूत 23 धावा केल्या आणि टी नटराजनने त्याला बाद केले. यानंतर गिल आणि नितीश राणा यांनी दुसर्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल 36 धावांवर बाद झाला. नितीश राणाने 29 धावा केल्या. कर्णधार इयान मॉर्गनने 34 तर दिनेश कार्तिकने 29 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून टी. नटराजनने सर्वाधिक दोन गडी बाद केले. बासिल थंपी, विजय शंकर आणि रशीद खान यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्यानंतर हैदराबादने कोलकाताच्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केन विल्यमसन आणि जॉनी बेअरस्टोची शानदार सुरुवात केली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 6.1 षटकांत 57 धावांची भागीदारी केली. विल्यमसन 29 धावांवर बाद झाला. कर्णधार डेविड वॉर्नरने नाबाद 47 धावांची खेळी केली. जॉनी बेअरस्टॉने 36 तर अब्दुल समदने 23 धावांची खेळी केली.