एक्स्प्लोर

दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला, 72 धावांनी मात

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

केपटाऊन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीत अखेर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. पण प्रतिस्पर्धी संघांच्या वेगवान गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या खेळावर निर्विवाद गाजवलं. आधी भारताच्या वेगवान चौकडीने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 208 धावांचंच लक्ष्य होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 135 धावांतच आटोपला. गोलंदाजांनी सावरलं, मात्र फलंदाजांची दमछाक दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 208 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावातील 77 धावांच्या पिछाडीमुळे, भारतासमोर 208 धावांचं लक्ष्य होतं. आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मात्र फलंदाजांना 208 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयश आलं. आफ्रिकेने आज दोन बाद 65 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र त्यांचा हुकमी फलंदाज हाशिम आमलाला मोहम्मद शमीने माघारी धाडून आफ्रिकेला गळती लावली. आमलाने 4 धावा केल्या. मग नाईट वॉचमन रबाडालाही शमीनेच बाद केलं. त्यानंतर बुमराने कर्णधार ड्युप्लेसिला भोपळाही फोडू दिलं नाही, तर डिकॉकला अवघ्या 8 धावांवर माघारी धाडलं. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन डिव्हिलियर्सने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही. डिव्हिलियर्सच्या रुपाने आफ्रिकेची दहावी विकेट गेली. डिव्हिलियर्सने 35 धावा केल्या. त्याला बुमराने भुवनेश्वरकरवी झेलबाद केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT : धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछाड, BCCI अजून गप्प, नेमकं काय घडलं?
धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछाड, BCCI अजून गप्प, नेमकं काय घडलं?
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
SRH vs RR Eliminator IPL 2026 : एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
SRH vs RR  Eliminator IPL 2026: आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद भिडणार; पराभूत संघाची होणार EXIT
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान आणि हैदराबाद भिडणार; पराभूत संघाची होणार EXIT

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Embed widget