एक्स्प्लोर
सौरव गांगुली यांची रुग्णालयातून घरवापसी; व्यक्त होत म्हणाले....
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सौरव गांगुली यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. खुद्द गांगुली यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना येत्या काळात आपण लवकरच काम पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती दिली.
Sourav Ganguly Health Update बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सौरव गांगुली यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुडलँड्स रुग्णालयातून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत ही बातमी प्रथमत: जाहीर करण्यात आली. ज्यानंतर खुद्द गांगुली यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना येत्या काळात आपण लवकरच काम पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती दिली.
2 जानेवारीला गांगुली यांना व्यायाम करतेवेळी हृदयविकाराचा हलका झटका आला होता. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. Woodlands Hospital मध्ये दाखल करणयात आल्यानंतर त्यांच्यावर angioplasty एन्जिओप्लास्टी करण्यात आली.
IND vs AUS 3rd Test | सिडनीच्या मैदानात मोहम्मद सिराजला हुंदका, राष्ट्रगीत सुरु असताना भावुक रुग्णालयातून रजा मिळाल्यानंतर ''एबीपी''च्या प्रतिनिधींशी गांगुली यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. 'हा आयुष्याचाच एक भाग आहे. गोष्टी घडतच राहतात. पण, आता मी पूर्णपणे बरा आहे. किंबहुना येत्या काही दिवसांमध्येच या परिस्थितीवर माझं शरीर कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहत मी कामाला सुरुवात करणार आहे', असं ते म्हणाले. दरम्यान, Woodlands रुग्णालयातील 9 डॉक्टरांच्या टीमनं गांगुली यांच्यावर उपचार करत त्यांची काळजी घेतली. दादा clinically fit असल्याचं जाहीर केल्यानंतर काही रितसर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.#WATCH | "I thank the doctors at the hospital for the treatment. I am absolutely fine," says BCCI President Sourav Ganguly after being discharged from Kolkata's Woodlands Hospital. pic.twitter.com/BUwsz5h1FQ
— ANI (@ANI) January 7, 2021
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement