एक्स्प्लोर

टी-20 लीगमध्ये स्मृती मानधनाचा शतकी झंझावात

इंग्लंडमध्ये होत असलेल्या या सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा तिच्याच नावावर आहेत.

इंग्लंड : भारताच्या स्मृती मानधनाने इंग्लंडमधल्या  टी-20 लीगमध्ये आपला सुपर फॉर्म पुन्हा दाखवून दिला आहे. वेस्टर्न स्टॉर्म्सकडून खेळताना स्मृतीने अवघ्या 60 चेंडूंत शतक झळकावलं. तिच्या या कामगिरीच्या जोरावर वेस्टर्न स्टॉर्म्सने लँकेशायर थंडरवर सात विकेट्सनी विजय मिळवला. स्मृती सध्या इंग्लंडमधील किया वुमन क्रिकेट सुपर लीग स्पर्धेत स्टॉर्म्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लँकेशायर थंडरविरोधात काल (शुक्रवार) झालेल्या सामन्यात स्मृतीने 61 चेंडूंत 102 धावांची खेळी उभारली. तिच्या या खेळीला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज होता. स्मृतीच्या या आतषबाजीने वेस्टर्न स्टॉर्म्सला 154 धावांचं लक्ष्य 19 व्या षटकांत गाठून दिलं. इंग्लंडमध्ये होत असलेल्या या सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा तिच्याच नावावर आहेत. सामन्यात लँकेशायर थंडरने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत सात बाद 153 धावा केल्या होत्या. यात न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेटच्या 83 धावांच्या खेळी केली. तर 154 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृतीच्या 102 धावांच्या खेळीच्या बळावर वेस्टर्न स्टोर्म संघाने 18.3 षटकांत विजय मिळवला. लँकेशायर थंडरकडून खेळणारी भारताची हरमनप्रीत कौर या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Embed widget