VIDEO : दिल्लीत शुभमन गिलचा सुपरमॅन अवतार, हवेत उडी मारून घेतला चंद्रपॉलचा ‘स्वप्नवत’ कॅच, व्हिडीओ एकदा पाहाच...
दिल्लीतील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत सामन्यात कर्णधार शुभमन गिलने फलंदाजीसोबतच अप्रतिम क्षेत्ररक्षणानेही चाहत्यांची मने जिंकली.

India Vs West Indies 2nd Test : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना सहज जिंकणारा भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात पण वरचढ दिसत आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 270 धावांची मोठी आघाडी घेतली. फॉलोऑनमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजला पहिला धक्का मोहम्मद सिराजने दिला. पण, या विकेटमध्ये शुभमन गिलने मोठी भूमिका बजावली.
दिल्लीत शुभमन गिलचा सुपरमॅन अवतार (Shubman Gill Catch)
दिल्लीतील रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत सामन्यात कर्णधार शुभमन गिलने फलंदाजीसोबतच अप्रतिम क्षेत्ररक्षणानेही चाहत्यांची मने जिंकली. भारतने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात चंद्रपॉल सावधपणे खेळत होता. पण नवव्या षटकात मोहम्मद सिराजच्या तिसऱ्या चेंडूवर त्याचा संयम सुटला. त्याने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू नीट टायम झाला नाही. जो 30 यार्ड वर्तुळाच्या आतच राहिला. शॉर्ट मिडविकेटवर उभा असलेला शुभमन गिल चपळाईने धावत गेला आणि हवेत उडी मारत झेल घेतला. त्याचा तो सुपरमॅन कॅच पाहून सर्वजण थक्क झाले.
Gravity takes a break! ⚠
— Star Sports (@StarSportsIndia) October 12, 2025
Captain @ShubmanGill takes a stunner and @mdsirajofficial gets his wicket. 👏
Catch the LIVE action 👉https://t.co/Gdi0klvyUf#INDvWI 👉 2nd Test, Day 3 | Live Now on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/lvOaACSSpk
चंद्रपॉलने दुसऱ्या डावात 30 चेंडूंचा सामना करत 10 धावा केल्या. पहिल्या डावातही त्याने 67 चेंडूंत 34 धावा केल्या होत्या, पण चांगली सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकला नाही. क्षेत्ररक्षणापूर्वी फलंदाजीत गिलची बॅट तुफान चालली. चौथ्या क्रमांकावर उतरलेला गिल 196 चेंडूंमध्ये नाबाद 129 धावा करून परतला. त्याच्या इनिंगमध्ये 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 65.81 होता.
पहिल्या डावात वेस्ट इंडिज 248 धावांवर ऑलआऊट...
वेस्ट इंडिजने भारतासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 81.5 षटकांत त्यांचा संघ 248 धावांत बाद झाला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर त्यांच्या हातात सहा विकेट्स होत्या. पण तिसऱ्या दिवशी भारताने त्यांचे उर्वरित फलंदाज अंदाजे 39 षटकांत बाद केले. अॅलिक अथानाझेने 41 धावा काढल्या, तर शाई होपने 36 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवने कहर केला. 30 वर्षीय फिरकी गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करत पाच फलंदाजांना बाद केले.
हे ही वाचा -





















