एक्स्प्लोर

शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे.

Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याची 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केलं. अविनाशही ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी मेहनत घेत आहे. 

अविनाश साबळेनं रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 8:11.63 वेळ नोंदवून सहावं स्थान पटकावलं आहे. आपलं नाव सहाव्या स्थानी नोंदवत अविनाश साबळे 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यानं आठ मिनिटांत 11. 63 सेकंदांमध्ये पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीफलचेस स्पर्धेत अंतर गाठलं आहे आणि यातून त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळाली आहे. 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात पॅरिस या ठिकाणी होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे.

बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातील अविनाश साबळे याने टोकियो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022)  देखील चांगली कामगिरी केली होती. रयाबीत डायमंड लीग स्पर्धेत त्याने 300 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 8:12:48 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता, तर अविनाशनं आत्तापर्यंत 9 वेळा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. दुसऱ्यांदा अविनाश साबळे याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.  

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य भरारी

महाराष्ट्राच्या अविनाश साबळे यानं बर्मिंगहॅममधल्या (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास घडवला होता. त्यानं तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत अविनाशनं जिंकलेलं भारताचं आजवरचं पहिलं पदक ठरलं. या शर्यतीत अविनाश साबळेनं आठ मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली. त्याचा हा आजवरचा नववा राष्ट्रीय विक्रम ठरला होता. अविनाशनं रबात डायमंड लीगमधला आठ मिनिटं 12.48 सेकंदांचा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आज मोडीत काढला. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेत दाखल झाला आहे. 

घरती परिस्थिती बेताची, तरीही अविनाशनं गाठलंय यशाचं शिखर 

अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. अविनाश आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचं एक-एक शिखर सर करतोय आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचे शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही. आता अविनाश दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी करुन इतिहास रचण्यासाठी अविनाशला एबीपी माझाकडून खूपखूप शुभेच्छा!  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget