(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubman Gill : अख्ख्या पाकिस्तानात एकट्या शुभमन गिलची हवा; बाबर आझम 'प्रिन्स'च्या मागं पुढं सुद्धा नाही!
Shubman Gill : सध्या शुबमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण त्याने बाबर आझमला आणखी एका प्रकरणात मागे टाकले आहे, त्यामुळे बाबर आझम पुन्हा ट्रोल होऊ लागला आहे.
Shubman Gill : टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिलने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाज आणि माजी कॅप्टन बाबर आझमला मागे टाकून एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला. सध्या दोन्ही खेळाडूंमध्ये केवळ 2 रेटिंग गुणांचा फरक आहे, मात्र बाबर आझमचा (Babar Azam) फॉर्म आणि नशीब पाहता हा फरकही मोठा वाटतो. सध्या शुबमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण त्याने बाबर आझमला आणखी एका प्रकरणात मागे टाकले आहे.
अख्ख्या पाकिस्तानात एकट्या शुभमन गिलची हवा
गुगलने (Google searches in Pakistan in 2023) नुकतीच काही आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार विराट कोहली या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींपैकी एक होता. शुभमन गिल सुद्धा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणार्या क्रिकेटपटूंपैकी एक आहेच, पण 2023 मध्ये किस्तानमध्ये सुद्धा गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या लोकांच्या यादीत 8व्या क्रमांकावर आहे.
Shubman Gill is in the Top 10 Google searches in Pakistan in 2023.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2023
No Babar Azam in the Top 10 list. (GeoNews). pic.twitter.com/KSF1NJoEcE
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, गिल या बाबतीत टॉप-10 मध्ये आहे, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम देखील टॉप-10 मध्ये नाही. यावरून गेल्या वर्षभरात या दोन खेळाडूंच्या लोकप्रियतेत किती बदल झाला आहे, हे कळू शकते. बाबर आझमला त्याच्याच देशात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप-10 लोकांमध्ये स्थान नाही आणि शुभमन गिल इतर देशांमध्येही इतका लोकप्रिय आहे की त्याला बाबरपेक्षा जास्त शोधले जाते.
Major Missing opener bond Rohit-Gill 🫂
— ✵ (@beliketweety) December 12, 2023
Gill teasing Ro and him be like - kya yaaaaaar 😭😂#ShubmanGill #RohitSharma pic.twitter.com/ztR4Itlusu
हा आकडा समोर येताच बाबर आझमला पुन्हा एकदा ट्रोल केले जाऊ लागले, मात्र सध्या बाबर आझमचे लक्ष या ट्रोलिंगवर नसून उद्यापासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर असेल कारण तो विश्वचषक स्पर्धेनंतर खेळणार आहे. पाकिस्तानी संघ नवीन कसोटी कर्णधारासह (शान मसूद) या मालिकेत उतरला आहे, त्यामुळे शान मसूद पाकिस्तानला ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकून देऊ शकेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
इतर महत्वाच्या बातम्या