महाराष्ट्रात रायफल नेमबाजांची फळी घडवणारे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचं कोरोनामुळे निधन
अंजली भागवत आणि सुमा शिरूर यांच्यासारख्या ऑलिम्पियन्ससह महाराष्ट्रात रायफल नेमबाजांची मोठी फळी घडवणारे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती (coach Sanjay Chakravarty) यांचं शनिवारी रात्री कोरोनामुळे निधन झालं.
मुंबई : अंजली भागवत आणि सुमा शिरूर यांच्यासारख्या ऑलिम्पियन्ससह महाराष्ट्रात रायफल नेमबाजांची मोठी फळी घडवणारे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचं काल रात्री कोरोनामुळे निधन झालं. ते 79 वर्षांचे होते.
महाराष्ट्रात 1990 च्या दशकात रायफल नेमबाजांची एक पिढी घडवण्यात संजय चक्रवर्ती यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळं भारताच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्याच काळात अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग या ऑलिम्पिक पदकविजेत्यांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. गेली चाळीस वर्षे ते नेमेबाजीचे प्रशिक्षण देतात.
केंद्र शासनानं द्रोणाचार्य आणि राज्य शासनानं दादोजी कोंडदेव पुरस्कारानं प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचा गौरव केला होता. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. पण कर्करोगाची लढाई त्यांनी धैर्यानं जिंकली होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं त्यांचं निधन झालं.
महत्वाच्या बातम्या :