(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर
Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली. सन 2019-20 मधील क्रीडा पुरस्कार ठाण्यातील श्रीकांत शरदचंद्र वाड यांना देण्यात आला आहे. तर 2021-22 मधील जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे (Snehal Mandhare) हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या स्नेहलला सन 2019-20 या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.
गिरीश महाजन म्हणाले ,राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
राज्यातील क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्य सरकारने आज गेल्या तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार आज जाहीर केले. सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ठाण्याचे श्रीकांत शरदचंद्र वाड यांना, तर 2021-22 चा जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. तीन वर्षांतील एकूण 116 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांचे #क्रीडा_पुरस्कार आज जाहीर झाले. सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ठाण्याचे श्रीकांत शरदचंद्र वाड यांना, तर २०२१-२२ चा जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे.@girishdmahajan
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 14, 2023
या पुरस्कारांमध्ये उल्लेखलेल्या तिन्ही वर्षांतील पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरवर पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या विभागांचा समावेश आहे.
बातमी अपडेट होत आहे.