एक्स्प्लोर

Shikhar Dhawan : लेकरा मी सगळीकडून ब्लाॅक झालोय, डायरेक्ट मेसेज करु शकत नाही, पण मनातून बोलतोय; शिखर धवनची काळीज चिरणारी पोस्ट

Shikhar Dhawan : धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने एक भावनिक पोस्ट केली आहे. त्याची काळीज चिरणारी पोस्ट पाहून कोणं म्हणतं बाप रडत नाही? अशी प्रतिक्रिया उमटली आहे. 

Shikhar Dhawan : भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळांमुळे सर्वाधित चर्तेत आहे. त्याला अलीकडेच पत्नी आयशापासून घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) यांचा घटस्फोट झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी (26 डिसेंबर) वाढदिवस झाला. मात्र, मुलांचा ताबा पत्नीकडे असल्याने तो मुलग्याला भेटू शकत नाही. त्यामुळे धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने एक भावनिक पोस्ट केली आहे. त्याची काळीज चिरणारी पोस्ट पाहून कोणं म्हणतं बाप रडत नाही? अशी प्रतिक्रिया उमटली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

वर्षभरापासून धवन आपल्या मुलाला भेटला नाही

शिखर धवन गेले वर्षभर आपल्या मुलाला भेटू शकलेला नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून जोरावरला पाहू शकलेला नाही. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. 'मी तुला शेवटचं पाहून एक वर्ष झालं आहे. मला आता जवळपास तीन महिन्यांपासून सर्वत्र ब्लॉक केलं गेलं आहे. म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, मला तोच जुना फोट पोस्ट करून सांगायचे आहे.

धवन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो... 

माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरी मी थेट कनेक्ट होऊ शकत नसलो तरी, मी नेहमीच तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे (मनातून संवाद) जोडलेला असतो. मला तुझा खूप अभिमान आहे, आणि मला माहित आहे की तुझं खूप चांगलं चाललं आहे, मोठा होत आहेस. तुझे बाबा तुझी नेहमीच आठवण ठेवतात आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक राहतो आणि देवाच्या कृपेनं भेटीच्या दिवसाची वाट पाहतो. खोडकर हो, परंतु विचलित होऊ नकोस. इतरांना मदत कर, नम्र हो, दयाळू हो, धीर धरायला शिक आणि मजबूत रहा. तुला भेटण्यास सक्षम नसतानाही, मी जवळजवळ दररोज तुला मेसेज पाठवतो. मला तुझ्या चांगलं असण्याबद्दल आणि दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा काय घडत आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम.


Shikhar Dhawan : लेकरा मी सगळीकडून ब्लाॅक झालोय, डायरेक्ट मेसेज करु शकत नाही, पण मनातून बोलतोय; शिखर धवनची काळीज चिरणारी पोस्ट

धवनच्या पोस्टही नेटकरी भावूक 

शिखर धवनची काळीज चिरणारी पोस्ट पाहून चाहत्यांसह नेटकरी सुद्धा भावूक झाले. एका यूजरने लिहिलं की,  या ओळी वाचून माझे हृदय तुटले आहे. दुसर्‍याने लिहिलं की, आणि इथं सर्व पुरुष रडले. एकाने लिहिलं, कोण म्हणतं पुरुष रडत नाहीत? त्याला इथं आणा.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
IPL 2026 सुरु असतानाच कुलदीप यादव चेन्नईच्या ताफ्यात, बंगळुरुच्या टीममध्ये मोठा बदल, प्लेऑफच्या लढतीपूर्वी मोठी घडामोड
IPL मध्ये मोठी घडामोड, कुलदीप यादव चेन्नईच्या ताफ्यात, बंगळुरुच्या टीममध्ये मोठा बदल 
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Embed widget