Saud Shakeel : पाकिस्तानी वर्ल्डकपच्या इतिहासात सौद शकीलचा मोठा पराक्रम अन् अडचणीतील डावही सावरला
Saud Shakeel : आक्रमक फलंदाजी करत सौद शकीलने अवघ्या 32 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्याच्या नावावर पाकिस्तानच्या वर्ल्डकप इतिहासातील एक मोठा पराक्रम नोंदवला गेला.
हैदराबाद : वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात (ICC Cricket World Cup 2023) अतिशय सोपा पेपर असलेल्या पाकिस्तान (Pakistan) संघाची अवस्था दुबळ्या नेदरलँडविरुद्ध (Pakistan vs Netherlands) अतिशय निराशाजनक झाली. नाणेफेक जिंकून नेदरलँडने पाकिस्तानला फलंदाजी दिल्यानंतर पाकिस्तानची सलामीची फळी चांगलीच चाचपडताना दिसून आली. अवघ्या 9.1 षटकामध्ये पाकिस्तानची अवस्था तीन बाद 38 अशी झाली होती.
पाचव्या विकेटसाठी भागीदारी करत संघाचा डाव सावरला
सलामीवीर फकर जमान अवघ्या 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर इमाम उल हक सुद्धा 15 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम सुद्धा अवघ्या पाच धावा करून तांबूत परतला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 9.1 षटकात तीन बाद 38 झाली होती. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद रिजवान आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या सौद शकीलने पाचव्या विकेटसाठी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. या दोघांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे पाकिस्तानला अडचणीतून सन्मानजनक स्थितीत पोहोचता आले. दोघांनी अर्धशतकी खेळी केल्याने संघाच्या डावाला आकार आला.
पाकिस्तानच्या वर्ल्डकप इतिहासातील दुसरी वेगवान दुसरे वेगवान अर्धशतक
दुसरीकडे आक्रमक फलंदाजी करत सौद शकीलने अवघ्या 32 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्याच्या नावावर पाकिस्तानच्या वर्ल्डकप इतिहासातील एक मोठा पराक्रम नोंदवला गेला. त्याचे पाकिस्तानच्या वर्ल्डकप इतिहासातील दुसरी वेगवान दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. शकीलने 32 चेंडू 50 धावा फटकावताना त्याने संघाचा डाव सावरलाच, मात्र स्वतः नावावरती सुद्धा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे पाकिस्तानने 25 षटकांमध्ये 26.1 शतकात दीडशतकी मजल मारली आहे. दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिजवानने सुद्धा चांगली साथ दिली.
मात्र, मोठी खेळी करण्यात सौद शकीलला अपयश आलं. 68 धावांवर असताना सौदला आर्यन दत्तने माघारी जमलेली जोडी फोडली. रिजवान आणि सौद शकीलने पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली.
इतर महत्वाच्या बातम्या