एक्स्प्लोर

Asian Games : आशियाई गेम्समध्ये अफगाणिस्तानच्या टीमनं पाकिस्तानला लोळवलं; सुवर्णपदकासाठी उद्या भारताविरोधात लढणार

आशियाई गेम्समध्ये पाकिस्तानच्या ज्युनिअर संघाला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अफगाणिस्ताने अक्षरशः लोळवत गेमच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने चार विकेटने पराभव करत अंतिम प्रवेश केला.

Asian Games : भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सीनियर संघ नेदरलँडविरुद्ध चाचपडत असतानाच तिकडं आशियाई गेम्समध्ये (Asian Games) पाकिस्तानच्या (Pakistan) ज्युनिअर संघाला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अफगाणिस्ताने ( Afghanistan) अक्षरशः लोळवत गेमच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने चार विकेटने पराभव करत अंतिम प्रवेश केला. त्यामुळे अफगाणिस्तानची लढत आता सुवर्णपदकासाठी भारताशी होईल. उद्या ( 7 ऑक्टोबर) रोजी सकाळी साडे अकरा वाजता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील टीम इंडियाविरोधात (India will face Afghanistan in Final of Asian Games) अफगाणिस्तानची लढत होईल. भारताने आज बांगलादेशला सहज धुळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने पहिल्यांदा पाकिस्तानला फलंदाजी दिली. मात्र, पाकिस्तानचा डाव अवघ्या 115 धावांमध्ये 18 षटकांमध्ये आटोपला. अफगाणिस्तान गुलबदीन एक विकेट घेतली, तर फरीद अहमदने तीन विकेट घेतल्या. कईस अहमदने दोन विकेट घेतल्या. करीम जनतने एक विकेट, तर झहीर खानने दोन विकेट घेतल्या.  अवघ्या 115 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या अफगाणिस्तानची ( Afghanistan) सुरुवात सुद्धा खराब झाली होती. अवघ्या 14.1 षटकांत 6 बाद 84 अशी झाली होती. मात्र, सातव्या विकेटसाठी गुलबदीन नैब शराफुद्दीन अश्रफ यांनी केलेल्या 32 धावांच्या  भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानला विजय मिळवता आला. 

तत्पूर्वी, आज सकाळी झालेल्या लढतीत ऋतुराज्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा (Bangladesh) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 96 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून तिलक वर्माने नाबाद 55 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 धावा केल्या. साई किशोरने 3 विकेट्स घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
KL Rahul Ind vs Sl 1st Test : KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget