एक्स्प्लोर
आवडता भारतीय क्रिकेटर कोण, सानिया म्हणते....
खरंतर तिच्या चाहत्यांनी सानियाला खूपच रंजक प्रश्न विचारले, पण तरीही सानियाने त्या प्रश्नांची उत्तरं दिली.
मुंबई: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. स्वत: टेनिस खेळणाऱ्या सानियाचं दुसरं प्रेम क्रिकेट आहे. त्यामुळेच की काय पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी तिने लगीनगाठ बांधली.
मात्र सानियाला चाहत्यांनी ट्विटरवरुन भारताचा आवडता क्रिकेटपटू कोण, यासह अनेक ‘पर्सनल’ प्रश्न विचारले. सानियाला ट्विटरवरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावरुन तिचं क्रिकेटप्रेम आणखी अधोरेखित होतं.
खरंतर तिच्या चाहत्यांनी सानियाला खूपच रंजक प्रश्न विचारले, पण तरीही सानियाने त्या प्रश्नांची उत्तरं दिली.
सानियाने यावेळी तिच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंची नावं सांगितलीच, शिवाय श्रीलंकेचा आवडता खेळाडू कोण हे सुद्धा सांगितलं.
भारताचा आवडता खेळाडू कोण, असं सानियाला विचारण्यात आलं. त्यावर सानियाने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे आवडते भारतीय क्रिकेटपटू असल्याचं सांगितलं.
एका फॅनने सानियाला श्रीलंकेचा आवडता खेळाडू कोण असा प्रश्न ट्विटरवर विचारला. त्यावर सानियाने कुमार संगकाराचं नाव घेतलं.
दुसऱ्या एका फॅनने सानियाला विराट कोहलीचं एका शब्दात वर्णन करण्याचा आग्रह केला. त्यावर सानियाने ‘चॅम्पियन’ असं ट्विट केलं.
याशिवाय रिकाम्या वेळेत तू काय करतेस, असा प्रश्नही सानियाला विचारण्यात आला. त्यावर सानियाने मजेशीर उत्तर देत, ‘काहीच नाही’ असं ट्विट केलं.
आवडता गायक कोण यावर सानियाने अरिजीत सिंग असं उत्तर दिलं.
शाहरुखचं थोडक्यात वर्णन करताना एक विनोदी आणि चांगला माणूस असं सानिया म्हणाली. तर कुछ कुछ होता है हा आवडता सिनेमा असल्याचं तिने सांगितलं.
सानियाला विचारलेले प्रश्न आणि तिने दिलेली उत्तरं
- आवडते भारतीय क्रिकेटर - कोहली, धोनी
- आवडता श्रीलंकन क्रिकेटर - कुमार संगकारा
- आवडता गायक - अरिजीत सिंग
- आवडतं पर्यटन स्थळ - मालदीव
- आवडता सिनेमा - कुछ कुछ होता है
- आवडतं खाद्य - बिर्याणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement