एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकरच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया
मुंबई : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सचिनने शस्त्रक्रियेनंतरचा गुडघ्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.
सचिनला गुडघेदुखीचा त्रास असल्याची कल्पना फारशी कोणाला नसल्यामुळे हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला. सचिनच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.
'काही दुखापती निवृत्तीनंतरही छळत राहतात. मला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मी लवकरच पुनरागमन करेन, गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून मी सध्या आराम करतोय' अशी माहिती सचिनने फेसबुकवर दिली आहे.
तासाभरातच सचिनच्या फोटोवर सहाशेच्यावर शेअर्स आले असून सचिनच्या हजारो फॅन्सनी त्याला आराम करण्याची विनंती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement