ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो.. हा गोलंदाज भारताविरुद्ध कहर करणार
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबरला पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.त्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राने काही अंदाज बांधले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. या दौर्यात भारतीय संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. संघाचा हा दौरा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत चालणार आहे. 27 नोव्हेंबरला हा संघ पहिला वनडे खेळणार आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये जागतिक दर्जाच्या खेळाडूंची कमतरता नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो की, ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज भारतीय फलंदाजांना भारी पडू शकतो. याव्यतिरिक्त त्याने ऑस्ट्रेलियाच्या अन्य वेगवान गोलंदाजांनाही संघासाठी फायद्याचे राहणार असल्याचा दावा केला आहे.
मिशेल स्टार्कवर मॅकग्राचा विश्वास
ग्लेन मॅकग्राला असा विश्वास आहे की वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क भारताविरुद्ध घातक ठरू शकतो. तो म्हणाले की, ऑस्ट्रेलियन संघाला यावेळी जिंकण्याची चांगली संधी आहे. याचं कारण म्हणजे मिशेल स्टार्क सारखा प्रतिभावान गोलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहे. चांगली लय असल्यास तो चार ते पाच विकेट घेऊ शकतो. त्याच्याकडे अद्भुत प्रतिभा असून भारतीय फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचबरोबर त्याने पॅट कमिन्सचंही कौतुक केलं. कमिन्स प्रत्येक सामन्यात 100 टक्के योगदान देत असल्याचे सांगितले.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील मैदानावर कसून सराव; विराट कोहलीकडून व्हिडीओ शेअर
तो म्हणाले की, भारतीय फलंदाज वेगवान खेळपट्ट्यांवर अडखळतात. या स्पर्धेत हा महत्त्वाचा घटक आहे. पूर्वीच्या तुलनेत या खेळपट्ट्यांमध्ये बराच बदल झाला असून पूर्वीसारखा कोणताही बाऊन्स आता येत नाही. तरीही भारतापेक्षा या खेळपट्ट्या वेगवान आहेत. ग्लेन मॅकग्रा म्हणाला की, भारताकडेही जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादवसारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. जे सामना फिरवण्यास सक्षम आहेत. गेल्या वेळी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल सध्या उंचावलेलं आहे.