एक्स्प्लोर
VIDEO: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून पाडव्याच्या खास शुभेच्छा

मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे. तरुणींपासून आजीबाईंपर्यंत तर लहानमुलांपासून सेलिब्रिटींपर्यंत असे सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही मोठ्या जल्लोषात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. स्वत: सचिनंच आपल्या घरच्या पाडव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सचिननं गुढी उभारल्यानंतर सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर त्याचबरोबर टीम इंडियालाही शुभेच्छा द्यायला सचिन विसरला नाही. पाडव्याचा हा व्हिडिओ सचिननं शेअर केल्यानंतर त्याला आतापर्यंत हजारोजणांनी लाईक केलं आहे.
‘गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि आज उत्तम सुरुवात झाली नवीन वर्षाची, इंडियन टीमलाही हार्दिक शुभेच्छा’ असं म्हणत सचिननं पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा #GudiPadwa pic.twitter.com/BtYCMn5zVK
— sachin tendulkar (@sachin_rt) March 28, 2017
आणखी वाचा























