एक्स्प्लोर

Ruturaj Gaikwad vs Shubman Gill : टीम इंडियात गेल्या तीन वर्षात 32 ओपनर्सनी नशीब आजमावलं! ऋतुराज गायकवाड गिलचा करेक्ट कार्यक्रम करणार?

Team India : 1 जानेवारी 2020 पासून आतापर्यंत T20, कसोटी आणि ODI मध्ये ओपनिंग पोझिशन (नंबर 1 किंवा नंबर 2) खेळाडूंचे रेकॉर्ड पाहिल्यास तब्बल 20 क्रिकेटपटूंनी नशीब आजमावलं आहे. 

Ruturaj Gaikwad vs Shubman Gill : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका (india vs south africa) दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी टीम इंडियावर नजर टाकली तर सलामीच्या स्लॉटसाठी चुरशीची स्पर्धा आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये मिळून अर्धा डझनहून अधिक सलामीवीर आहेत. त्यांच्यामध्ये असे अनेक आहेत ज्यांनी एकदा किंवा दोनदा सलामीला फलंदाजी केली आहे. 1 जानेवारी 2020 पासून आतापर्यंत T20, कसोटी आणि ODI मध्ये ओपनिंग पोझिशन (नंबर 1 किंवा नंबर 2) खेळाडूंचे रेकॉर्ड पाहिल्यास तब्बल 20 क्रिकेटपटूंनी नशीब आजमावलं आहे. 

या तारखेपासून आतापर्यंत 14 जणांनी टी-20 मध्ये सलामी दिली असल्याचे समोर आले आहे. वनडे फॉरमॅटमध्ये 11 जण सलामीवीर ठरले आहेत. त्याचवेळी, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने या कालावधीत 7 सलामीवीर पाहिले आहेत. म्हणजे एकूणच टीम इंडियाने ओपनिंग पोझिशनमध्ये 32 सलामीवीर पाहिले आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. आता प्रथम जाणून घ्या टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणते खेळाडू सलामी देऊ शकतात. सलामीवीर रुतुराज गायकवाड आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचवेळी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नुकताच खेळाडू असलेला शुभमन गिल आफ्रिकन दौऱ्यावर वनडे फॉरमॅटमधून गायब आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या T20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते.

टी-20 सामन्यांतील सलामीवीर

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन

एकदिवसीय संघाचे सलामीवीर

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, केएल राहुल, संजू सॅमसन

कसोटी सामन्यांसाठी सलामीवीर

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, केएल राहुल

टीम इंडियाकडे 1 जानेवारी 2020 नंतर 14 टी-20 सलामीवीर 

टीम इंडियाचे 1 जानेवारी 2020 नंतर 11 एकदिवसीय सलामीवीर

शुभमन गिल हा वनडे फॉरमॅटमध्ये 1 जानेवारी 2020 नंतर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज आहे. यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. शिखरने सलामीवीर म्हणून धावाही केल्या आहेत, पण टीम इंडियाचे व्यवस्थापन त्याच्या नावाचा विचार करत नाही. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने अनेक खेळाडूंना ओपनिंग पोझिशनमध्ये आजमावले. रोहित शर्मा टी-20 मध्ये या काळात सर्वात यशस्वी सलामीवीर ठरला आहे. हे एकमेव कसोटी फॉर्मेट आहे जिथं टीम इंडियाने सर्वात कमी सलामीवीरांना आजमावले आहे. रोहित शर्मा सलामीवीर म्हणून कसोटी संघात धुमाकूळ घालत आहे.

शुभमन गिल विरुद्ध ऋतुराज गायकवाड 

30 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी तिन्ही संघात खेळलेला 'सर्व फॉरमॅटचा खेळाडू' शुभमन गिलचे नाव नव्हते. ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि श्रेयस अय्यर हे आता संघाचे नवे 'सर्व फॉरमॅटचे खेळाडू' आहेत. आशियाई क्रीडा 2023 मध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळणारा ऋतुराज गायकवाड हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. आतापर्यंत त्याने 4 वनडेत 26.50 च्या सरासरीने 106 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने टीम इंडियासाठी 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जिथे त्याने आपल्या बॅटने 140.05 च्या स्ट्राईक रेटने आणि 35.71 च्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. गायकवाडने कसोटी पदार्पण केलेले नाही, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो कसोटी पदार्पण करू शकेल, अशी अपेक्षा आहे.

ऋतुराज गायकवाडची स्पर्धा शुभमन गिलसोबत असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच संपलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत, गायकवाडने पाच सामन्यांमध्ये 55.75 च्या सरासरीने 223 धावा केल्या आणि तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. शुभमन गिल या मालिकेत खेळला नाही. दुसरीकडे, गिलने एकदिवसीय विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये 44.25 च्या सरासरीने आणि 106.94 च्या स्ट्राइक रेटने 354 धावा केल्या. पण, आता गायकवाड हा असा खेळाडू आहे, जो आफ्रिकन दौऱ्यावर टीम इंडियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी गायकवाडला शुभमन गिलकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते, असे माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राला वाटते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget