एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातच्या समित गोहेलने 117 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!
जयपूर : गुजरातचा सलामीवर समित गोहेलने ओडिशाविरुद्ध सामन्यात नाबाद 359 धावांची खेळी उभारुन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. समित गोहेल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
याआधी हा विक्रम इंग्लंडच्या सरे संघाच्या बॉबी अॅबेल यांच्या नावावर होता. बॉबी अबेल यांनी 1899 साली सॉमरसेटविरुद्ध 357 धावांची खेळी केली होती. आज समितने 117 वर्षांनंतर त्यांचा विक्रम मोडला.
तसंच समित गोहेल हा रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर आहे. भाऊसाहेब निंबाळकरांनी 1948 साली नाबाद 443 धावांची खेळी रचली होती.
दरम्यान, पार्थिव पटेलच्या गुजरात संघाने रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला. गुजरात आणि ओडिशा संघांमधला उपांत्यपूर्व सामना अनिर्णीत राहिला. पण पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर गुजरातने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं.
या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात 263 धावांची मजल मारली होती. तर ओडिशाचा पहिला डाव अवघ्या 199 धावांत आटोपला होता. मग समित गोहेलच्या नाबाद त्रिशतकी खेळीमुळे गुजरातने दुसऱ्या डावात 641 धावांचा डोंगर उभारुन ओडिशासमोर 706 धावांचं आव्हान दिलं होतं. ओडिशाने दुसऱ्या डावात एक बाद 81 धावांची मजल मारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement