Rafael Nadal French Open 2024: 'लाल माती'च्या बादशहाचा पराभव; राफेल नदाल फ्रेंच ओपनच्या पहिल्याच फेरीत गारद, निवृत्तीचेही संकेत
Rafael Nadal French Open 2024: फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची राफेल नदालची ही पहिलीच वेळ होती.
Rafael Nadal French Open 2024: लाल मातीचा बादशहा म्हणून राफेल नदालची (Rafael Nadal) जगभरात ख्याती आहे. पण लाल मातीच्या या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत राफेल नदालला पराभव पत्करावा लागला. राफेल नदालला पहिल्याच फेरीत अॅलेक्झँडर झ्वेरेव्हने पराभूत करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या झ्वेरेवकडून नदालचा 6-3, 7-3 (7-5), 6-3 असा पराभव झाला. फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची राफेल नदालची ही पहिलीच वेळ होती. राफेल नदालने यावेळी निवृत्तीचे संकेत दिल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे राफल नदाल आपल्याला खेळताना दिसणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
One to remember 👏
— Roland-Garros (@rolandgarros) May 27, 2024
See the Best Moments of the Day by @Emirates
#Emirates #FlyBetter pic.twitter.com/yusNJ9kwua
राफेल नदालने तब्बल 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. झ्वेरेवविरुद्ध त्याचा या स्पर्धेतील 116 वा सामना होता. 116 व्या सामन्यात त्याला केवळ चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. राफेल नदालला पराभूत करणारा झ्वेरेव हा केवळ तिसरा टेनिसपटू आहे. याआधी नोवाक जोकोविच आणि रॉबिन सॉडर्लिंगने पराभूत केले आहे.
राफेल नदाल काय म्हणाला?
राफेल नदालच्या या पराभवानंतरही त्याच्या समर्थकांनी त्यांना पूर्ण साथ दिली. यासाठी नदालने त्यांचे आभार मानले. या स्पर्धेतील त्याचा शेवटचा सहभाग आहे की नाही हे सांगणे कठीण असल्याचं राफेल नदालने सांगितले. मला बोलणे अवघड आहे. तुमच्या सर्वांसमोर ही शेवटची वेळ असेल की नाही माहीत नाही. मला खात्री नाही. पण जर शेवटच्या वेळी मी खेळाचा आनंद घेतला. आज माझ्या मनातल्या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मला ज्या ठिकाणी सर्वात जास्त आवडते, तेथील लोकांचे प्रेम अनुभवणे माझ्यासाठी खूप खास आहे, असं बोलताना राफेल नदाल भावूकही झाल्याचे पाहायला मिळाले.
We love you too Rafa, and we hope to see you again next year 🧡#RolandGarros pic.twitter.com/7hX4Gw46WE
— Roland-Garros (@rolandgarros) May 27, 2024