एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणेरी पलटनला नमवून गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानावर
गुजरात फॉर्च्यूनजायंट्स संघाने पुणेरी पलटनचा परभव करुन अ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
पुणे : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सिजनमध्ये गुजरात फॉर्च्यूनजायंट्स संघाने पुणेरी पलटनचा परभव करुन अ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रिडा संकूलात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रेडींगमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पुणेरी पलटण संघाला घरच्या मैदानावर खेळताना पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात गुजरात फॉर्च्यूनजायंट्स संघाने पुणेरी पलटणचा 35-20 ने पराभव करत गुजरातच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या विजयासह गुजरातने अ गटात यू मुम्बाला मागे टाकत पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे. अ गटात खेळल्या गेलेल्या 15 सामन्यांपैकी 11 सामन्यांमध्ये गुजरातने बाजी मारली आहे. याचबरोबर 63 गुणांसह अंकतालीकेत पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान पुणेरी पलटनला अ गटात खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये पुणेरी पलटनला पराभव पत्कारावा लागला आहे.
या सामन्यात गुजराततर्फे रेडींगमध्ये सचिन 7, प्रापरंजन 5 , सुनील कुमार, रोहित गुलिया आणि ऋुतूराज कोरावी यांनी प्रत्येकी चार चार गुणांची कमाई केली.WE MAKE OUR OWN FORTUNE! ????
That's how you spell clinical with a performance! ???? The Giants are on a high and back at the top of the table! ????#GarjegaGujarat #NayaKhoonDugnaJunoon #PUNvGUJ pic.twitter.com/6h3QtBCguj — Gujarat Fortune Giants (@Fortunegiants) November 29, 2018
Not our night. We fought but it wasn’t enough against a strong @Fortunegiants team. We learn and move on to the next game. Thank you #Pune for a #Bhaari welcome once again! #PadengeBhaari#Kabaddi #VivoProKabaddi pic.twitter.com/RUqpTWMRNV
— Puneri Paltan (@PuneriPaltan) November 29, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement